Italy Burqa Ban : इटलीत सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाब घालण्यास बंदी !

जगभरात २० हून अधिक देशांत बंदी !

(बुरखा म्हणजे संपूर्ण शरीर झाकण्याचे वस्त्र आणि नकाब म्हणजे चेहरा झाकण्याचे जाळी असलेले वस्त्र)

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (डावीकडे)

रोम – इटलीतील सत्ताधारी पक्ष ‘ब्रदर्स ऑफ इटली’ने नुकतेच संसदेत नवे विधेयक मांडले. या विधेयकात सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाब घालण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या पक्षाचे म्हणणे आहे की, हा कायदा ‘धार्मिक कट्टरता’ रोखण्यासाठी आणला जात आहे. प्रस्तावित कायद्याप्रमाणे शाळा, विद्यापिठे, कार्यालये, दुकाने आणि सरकारी इमारती यांसह कोणत्याही सार्वजनिक स्थळी बुरखा आणि नकाब पूर्णपणे प्रतिबंधित असेल. नियम मोडणार्‍यांना २८ सहस्र ते २ लाख ८० सहस्र रुपये इतका दंड होऊ शकतो.

फ्रान्स हा बुरख्यावर बंदी आणणारा पहिला युरोपीय देश ठरला होता. फ्रान्सने वर्ष २०११ मध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घातली होती. त्यापाठोपाठ बेल्जियम, ऑस्ट्रिया, तुर्कीए, ट्युनिशिया, श्रीलंका आणि स्वित्झर्लंड यांसह २० हून अधिक देशांनी बुरखा किंवा नकाब यांवर बंदी आणली. युरोपीयन मानवाधिकार न्यायालयानेही या बंदीला मान्यता दिली आहे.

संपादकीय भूमिका

प्रत्येक देश स्वतःच्या नागरिकांच्या सुरक्षेला सर्वाेच्च प्राधान्य देतो, हे लक्षात घेऊन भारतानेही यासाठी ठोस पाऊले उचलावीत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?