
छत्रपती संभाजीनगर – अतीवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या मराठवाड्यातील शेतकर्यांना त्वरित थेट आर्थिक साहाय्य मिळावे, त्याचप्रमाणे शेतकर्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, पंजाबच्या धर्तीवर ५० सहस्र रुपये हेक्टरी साहाय्य, पीक विम्याचे नवीन निकष रहित करून पूर्वीचेच निकष कायम ठेवावेत, घरे आणि पशूधन हानीभरपाई त्वरित देण्यात यावी, या मागणीसाठी ५ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण मराठवाडाव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरसकट ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी ११ ऑक्टोबर या दिवशी संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयावर ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
मोर्चा असल्याने याच्या पूर्वसिद्धतेनिमित्त उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवराई आणि गाडी जळगाव येथे ग्रामसभा घेतली आहे. या प्रसंगी मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि गावकरी उपस्थित रहावे, असे आवाहन उपजिल्हाप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर यांनी केले आहे.
‘मराठवाड्यात पावसाने थैमान घातलेले आहे. शेतीपिकांचे, घरादारांची संपूर्णपणे हानी झालेली आहे. या परिस्थितीत शेतकरी सरकारकडे साहाय्याची हाक मागत आहे; परंतु राज्यातील सरकार ढीम्म बसलेले आहे. हे सरकार शेतकर्यांच्या विरोधातील आहे’, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !