पुणे विद्यापिठातील प्रकार !

पुणे – उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा असणार्या पुणे विद्यापिठातील ‘रोजगार मार्गदर्शन आणि नियुक्ती विभागात’(प्लेसमेंट सेल) मनुष्यबळाची कमतरता आहे. कनिष्ठ साहाय्यक आणि शिपाई असे दोनच कर्मचारी कार्यरत असलेल्या या विभागाच्या माध्यमातून गेल्या ३ वर्षांत ४९७ विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. गेल्या ५ वर्षांत ३२ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च या विभागावर झाला आहे. ३० सप्टेंबर या दिवशी झालेल्या विद्यापिठाच्या अधिसभा बैठकीत सदस्य शंतनू लामधाडे यांनी विचारलेल्या ‘प्लेसमेंट सेल’विषयी प्रश्नांना उत्तर देतांना व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. देविदास वायदंडे म्हणाले.
विद्यापीठ अनुदान आयोगाने एकाचवेळी नियमित आणि दूरस्थ अशा दोन पदव्या घेण्याची मुभा दिली आहे; पण यासाठी स्थलांतर प्रमाणपत्र, मूळ शाळा सोडल्याचा दाखला मागितला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांची अडचण होते. ही अट रद्द करण्याचा ठराव अधिसभा सदस्य युवराज नरवडे यांनी मांडला. मुलींना विनामूल्य शिक्षण देण्याचा राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने महाविद्यालयांवर अंकुश ठेवण्यासाठी विद्यापीठाने कृती करावी, असा ठराव अधिवक्ता ईशान जोशी यांनी मांडला. इतर विद्यापीठाप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनूसार सहयोगी प्राध्यापकाची विभागप्रमुख म्हणून निवड करण्याचा ठराव अधिसभा सदस्य डॉ. हर्ष जगताप यांनी मांडला.
संपादकीय भूमिका‘विद्यापिठात दिव्याखाली अंधार आहे’, असे कुणी म्हटल्यास नवल ते काय ? |
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !