
पुणे – विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या ‘संभाजी’ कादंबरीत त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला असून महाराज यांच्या विषयी खोटी, आक्षेपार्ह आणि अपकीर्तीकारक माहिती दिली असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. विश्वास पाटील यांनी क्षमा मागून लिखाण मागे घ्यावे अन्यथा सातारा येथे होणारे ‘९९ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन’ होऊ देणार नाही, अशी चेतावणी संभाजी ब्रिगेडने दिली. पाटील आणि ‘अखिल भारतीय साहित्य परिषद’ यांना त्यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. (काही ना काही निमित्त काढून विश्वास पाटील यांना विरोध करून जातीयवाद पसरवण्याचे संभाजी ब्रिगेडचे नेहमीचे षड्यंत्र ! – संपादक)
| छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी संशोधन करून लेखन केले आहे. काही चूक राहिली असेल, तर ती दुरुस्त करण्यास आणि दिलगिरी (स्वकीय शब्द माहित नाही) व्यक्त करण्यास मी सिद्ध आहे; मात्र आक्षेप स्पष्टपणे सांगावेत, अशी मागणी ‘संभाजी’ कादंबरीचे लेखक आणि ‘९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना’चे निर्वाचित अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली आहे. |
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !