
सांगली, २८ सप्टेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवरायांचे धैर्य, शौर्य आणि दुर्दम्य इच्छाशक्ती हिंदु समाजात निर्माण करण्यासाठी आई जगदंबेची कृपा होवो, असे साकडे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी ६ व्या दिवशी दुर्गामाता दौडीच्या वेळी येथील श्री दुर्गामाता मंदिरात घातले.
पन्हाळगडावरून विशाळगडावर दोन्ही गडांवरचा वेढा तोडून छत्रपती शिवराय १२ घंट्यांनी पोचले. हे धैर्य, शौर्य , मनोबल आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी, ‘छत्रपती शिवरायांप्रमाणे दुर्दम्य इच्छाशक्ती हिंदु समाजात निर्माण होण्यासाठी, तो आदर्श निर्माण होण्यासाठी, हिंदु समाज घडण्यासाठी आई तू आम्हाला शक्ती, बुद्धी, युक्ती आणि बळ दे’, अशी प्रार्थना या वेळी करण्यात आली.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा