विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट केले जाऊ नयेत, यासाठी तातडीची कारवाई !

अहिल्यानगर – शनिशिंगणापूर देवस्थानवरील विश्वस्त मंडळ विसर्जित झाल्यानंतर येथे कागदपत्रांची फेरफार केली जात असल्याची माहिती समोर आली होती. येथील विश्वस्त मंडळावर भ्रष्टाचारासह अनेक आरोप करण्यात आले असून जिल्हाधिकार्यांनी या देवस्थानचे प्रशासक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देवस्थानच्या कार्यालयाला तात्काळ टाळे ठोकण्यात आले. (‘सील’ करण्यात आले.) विश्वस्त मंडळातील सदस्यांकडून मंदिर देवस्थान ट्रस्टच्या संदर्भातील भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट केले जाऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकार्यांनी तातडीची कारवाई केली आहे. जिल्हाधिकार्यांनी स्वत: पोलीस बंदोबस्तात हे कार्यालय सील केले. शनिशिंगणापूर देवस्थान कार्यालय सील करतांना येथील कार्यकारी अधिकारी मात्र अनुपस्थित होते. यापुढे देवस्थान समितीचा संपूर्ण कारभार प्रशासनाकडे असणार आहे.
संपादकीय भूमिकावक्फ बोर्ड आणि मदरसे येथे भ्रष्टचार अन् चुकीच्या गोष्टी चालत असल्याचे अनेकदा उघड झाल्यानंतर कधी कुठल्या प्रशासनाने कधी अशी ‘तातडीची’ कारवाई केली आहे का ? |
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात
बांदोडा येथील जैन समाजाच्या वारसा स्थळी मोहरमनिमित्त उघड्यावर बकरा कापण्यास बंदी घाला
जनकल्याण आणि दुष्काळ टळण्यासाठी आचरा येथील ग्रामस्थांचा श्री देव ठाणेश्वराला जलाभिषेक !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरार येथे धर्मप्रेमींसाठी ‘स्नेह’ मेळावा !
‘जीवोत्तम विद्यापीठम्’ सनातन धर्माच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार ! – श्रीमद् विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वामीजी
स्मार्ट मीटरच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांचे आंदोलन