|

ओटावा (कॅनडा) – खलिस्तानी आतंकवादी इंद्रजीत सिंह गोसल याला कॅनडामध्ये अटक झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यात जामिनावर सोडण्यात आले. कारागृहातून बाहेर येताच त्याने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना धमक्या दिल्या. त्याने कारागृहाबाहेर येऊन म्हटले, ‘मी आता मोकळा आहे. अजित डोवाल, तुम्ही कॅनडा, अमेरिका किंवा अन्य कोणत्याही युरोपीय देशात का येत नाही ? मला अटक करण्याचा किंवा माझ्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न का करत नाही ? डोवाल, मी तुमची वाट पहातो आहे.’
१. तो पुढे म्हणाला की, गुरपतवंत सिंह पन्नू याच्या खलिस्तान आंदोलनाला मी पाठिंबा देईन. २३ नोव्हेंबर २०२५ या दिवशी खलिस्तान जनमत चाचणी घेण्यासाठी मी सज्ज आहे. देहली खलिस्तान होईल.
२. पन्नू याचा उजवा हात मानला जाणारा गोसल वर्ष २०२३ मध्ये हरदीप सिंह निज्जर या खलिस्तान्याच्या मृत्यूनंतर ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी संघटनेचा कॅनडा देशातील प्रमुख बनला.
३. १९ सप्टेंबरला ओंटारियोमध्ये वाहतूक तपासणीच्या वेळी त्याला ‘धोकादायक हेतूसाठी शस्त्रे बाळगणे’ आदी आरोप ठेवून अटक करण्यात आली होती. या कारवाईच्या आदल्या दिवशीच डोवाल आणि कॅनडाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांची बैठक पार पडली होती. त्यामुळे ही कारवाई डोवाल यांच्यामुळे झाल्याचे सांगितले गेले होते.
संपादकीय भूमिकाअटकेत असलेल्या खलिस्तानी आतंकवाद्याची एका आठवड्यात सुटका होणे, हे निषेधार्ह ! कॅनडा पोलीस आणि खलिस्तानी आतंकवादी यांच्यात ‘मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर’, असाच प्रकार चालू आहे, असेच यातून म्हणता येईल ! |
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !
Jadavpur Bulldozer Action : बंगाल – जाधवपूर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत बांधकामे हटवतांना विरोध !
Iran Israel War : इराण-इस्रायल यांच्यात पुन्हा उडाला युद्धाचा भडका !
Philippines Earthquake : फिलिपीन्समध्ये ७.८ रिक्टर तीव्रतेचा भूकंप : १९ जणांचा मृत्यू !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !