
सावंतवाडी – महाराष्ट्र शासन आणि जर्मन येथील बेडन युटनबर्ग आस्थापन यांच्यामध्ये झालेला करार आदर्शवत आहे. या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळणार आहे. मी शिक्षणमंत्री होतो, तोपर्यंत या योजनेला गती दिली होती. आता या योजनेस होणारा विलंब पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला या योजनेचा समन्वयक म्हणून लक्ष देण्यास सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर योजनेला गती देता येणार आहे. जर्मनीला पाठवण्यात येणार्या तरुणांना दिलेली नियुक्ती पत्रे खोटी नाहीत. पारपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा जे उत्तीर्ण झाले त्यांना पारपत्र मिळाले आहे. पारपत्र मिळण्यासाठी ती परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, असे सांगून आमदार दीपक केसरकर यांनी ‘जर्मनीत नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणांची फसवणूक करण्यात आली’, हा आरोप फेटाळून लावला.
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक आणि सतिश सावंत यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन ‘जर्मनीत रोजगार देण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक करण्यात आली’, असा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर येथे घेतलेल्या पत्रकार परिदेत आमदार केसरकर म्हणाले, ‘‘काही लोकांनी मुलांच्या मनात अपसमज निर्माण केले. ओंकार कलावडे हे एक उद्योजक आहेत. जर्मनीत त्यांचे उद्योग आहेत. त्यांना शासनाचा निधी दिला गेला, हा चुकीचा समज आहे. स्वखर्चाने त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे विनाकारण अपकीर्ती केली जाऊ नये.’’
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !