
मुंबई – मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील पूरस्थितीविषयी सविस्तर चर्चा झाली. आतापर्यंत १ सहस्र ८२९ कोटी रुपये वितरीत झाले आहेत. उर्वरित निधी येत्या १० दिवसांत वितरीत होईल. पंचनामे होत आहेत. त्यानुसार मार्गदर्शक तत्त्वानुसार त्वरित निधी देण्यात येत आहे. एका तालुक्याचा अहवाल आला, तरी निधी दिला जात आहे. आमचे मंत्री आणि मीही २४ सप्टेंबर या दिवशी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागांमध्ये जाऊन पहाणी करणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ सप्टेंबर या दिवशी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की,
१. ‘पूरग्रस्तांना अधिकाधिक साहाय्य करण्याचे शासनाचे धोरण आहे. पुरामुळे ८ नागरिकांचा मृत्यू झाला असून १० जण घायाळ झाले आहेत.
२. पूरग्रस्त भागांतून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. आतापर्यंत ९७५ मिलीमीटर पावसाची नोंद आहे. धाराशिव, सोलापूर, जळगाव, अहिल्यानगर, बीड, परभणी या जिल्ह्यांना पुरामुळे फटका बसला आहे.
३. नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या १७ तुकड्या काम करत आहेत. पूरग्रस्थांना साहाय्यासाठी आतापर्यंत २ सहस्र २१५ कोटी रुपये वितरीत करण्याचे शासन निर्णय काढण्यात आले आहेत. राज्यातील ३१ लाख ६४ सहस्र शेतकर्यांना लाभ होईल.
४. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासाठी आवश्यक निधी केंद्रशासनाकडून प्राप्त झाला आहे. अधिक निधी लागल्यास त्याविषयी केंद्रशासनाकडे मागणी केली जाईल. अद्यापही साहाय्य करण्याचे कार्य चालू आहे.
५. राज्यात २७-२८ सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने प्रशासन सिद्धतेत आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी.
गोव्यात मौसमी पावसाचे आगमन
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !
शहरवासियांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा ! – निमेश नायर
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री