
पुणे, २२ सप्टेंबर (वार्ता.) – पितृपक्षात पुणे जिल्ह्यात ‘पितृपक्ष आणि आनंदी जीवनासाठी साधनेचे महत्त्व’ या विषयावर प्रवचने घेऊन मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला. श्राद्धविधी का करावेत ? श्राद्ध करण्याचे लाभ, त्याचे महत्त्व, पितरांना गती मिळण्यासाठी कोणत्या धार्मिक कृती कराव्यात ? या विषयावर प्रवचनाच्या माध्यमातून जिज्ञासू, धर्मप्रेमी, वाचक आणि हितचिंतक यांनी जाणून घेतले.




प्रवचनांच्या समवेतच अनेक ठिकाणी दत्तगुरूंच्या सामूहिक नामजपाचे नियोजनही केले होते. अनेक भजनी मंडळे, गृहनिर्माण संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, धर्मशिक्षणवर्ग, शाखा आदी ठिकाणी प्रवचने घेण्यात आली. हस्तपत्रक वितरण, फलकलेखन आदींच्या माध्यमातूनही पितृपक्षाच्या संदर्भातील विषय समाजापर्यंत पोचवण्यात आला. बालसंस्कारवर्गात येणार्या लहान मुलांनीही या पितृपक्षात दत्तगुरूंचा सामूहिक नामजप नियमित करण्याला महत्त्व दिले. पितृपक्षात श्राद्धविधी करण्यामागील शास्त्र समजले. ‘दत्तगुरूंच्या नामजपाने मनाला शांती लाभली’ इत्यादी अभिप्राय नामजपानिमित्त जोडल्या गेलेल्या जिज्ञासूंनी दिले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !