साधकांवरील प्रीती

१. रुग्णाईत साधकाची काळजी घेणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या समवेत सेवा करणार्या साधकांची प्रकृती ठीक नसेल, तर वेळोवेळी त्यांची चौकशी करतात. त्या साधकाला नामजपादी उपाय करायला सांगून आवश्यक तेवढी विश्रांती घ्यायला सांगतात.
२. साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांची प्रेमाने चौकशी करणे : कितीही व्यस्त असल्या, तरी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकांना भेटण्याचा प्रयत्न करतात. साधक भेटायला आल्यावर त्या साधक आणि त्यांचे कुटुंबीय यांची प्रेमाने चौकशी करतात. त्यांना काही साहाय्य हवे असल्यास विचारतात. त्यांना भेटल्यावर साधक त्यांचे त्रास आणि अडचणी हे सर्व विसरून आनंदी होतात. साधकाची एखादी अडचण असेल, तर ती ‘सुटली कि नाही’, याचा त्या स्वतः पाठपुरावा घेतात.

३. साधकांना सेवेतून आनंद मिळावा, यासाठी प्रयत्न करणे : साधकांना सेवा करतांना ‘काही अडचण येते का ? त्यांना ताण येतो का ? त्यांना आनंद मिळतो ना ?’, याविषयी त्या वेळोवेळी विचारणा करतात.

४. साधक भेटल्यावर आनंद होणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना साधकांना भेटायला पुष्कळ आवडते. साधक त्यांना भेटून साधनेविषयी मार्गदर्शन घेतात. ‘साधकांना भेटून पुष्कळ आनंद मिळतो’, असे त्या नेहमी सांगतात.
– कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
साधकांना घडवणे

१. साधकाला स्वभावदोषांवर मात करून सेवेचे बारकाईने नियोजन करायला शिकवणे आणि त्याचा सेवेसाठीचा उत्साह वाढवणे : एखाद्या साधकाकडून स्वभावदोषांमुळे सेवेत चुका होतात किंवा साधकाची ती सेवा करण्याची सिद्धता नसते. त्या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकाला ‘सेवेत काय चुकले ? काय करायला हवे ? कोणते स्वभावदोष कार्यरत आहेत आणि त्यावर कशी मात करायला हवी ?’ याविषयी मार्गदर्शन करतात. साधकाला त्या सेवेचे बारकाईने नियोजन करायला शिकवून त्याचा सेवेसाठीचा उत्साह वाढवतात. ‘हे कार्य गुरूंचे आहे आणि ते होणारच आहे; पण त्या सेवेच्या माध्यमातून साधकावर गुरुकृपा व्हावी आणि त्या त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी त्याच्याकडून प्रयत्न व्हावेत’, असे त्यांना वाटते.
२. ‘साधकांच्या साधनेची हानी होऊ नये’, यासाठी सतर्क असणे : एखाद्या साधकाची चूक लक्षात आली, तर ‘नेमकी चूक कशामुळे झाली ?’, हे त्या जाणून घेतात आणि साधकाला ‘योग्य कृती कशी करू शकला असता ?’, याविषयी सांगतात. ‘साधकाने चूक सांगितली नाही, तर त्याला त्यातून शिकून स्वतःमध्ये सुधारणा करता येणार नाही आणि त्याच्या साधनेची हानी झाली, तर ती मी पाहू शकत नाही’, असे त्या म्हणतात. यातून त्यांची साधकांवरील प्रीती लक्षात येते.
३. ‘साधकाने चुकांमध्ये न अडकता त्यातून शिकावे आणि पुढील सेवा आनंदाने करावी’, अशी तळमळ असणे : ‘साधकाने चूक झाल्यावर त्यामध्ये अडकू नये किंवा निराश होऊ नये. त्याने त्यातून शिकावे आणि पुढील सेवा आनंदाने करायला हवी’, असे त्यांना वाटते. त्या म्हणतात, ‘‘आपण परिपूर्ण नाही. आपण शिकण्यासाठीच इथे आलो आहोत. माझ्याकडूनही चुका होतात. मीसुद्धा शिकते आहे.’ ‘गुरुदेवांनी त्यांना कसे घडवले ?’, याविषयीही त्या मध्ये मध्ये सांगतात.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सहवासात आल्यावर मनाची स्थिती सकारात्मक होऊन उत्साह आणि आनंद जाणवणे : कधी माझ्या मनाची स्थिती ठीक नसेल किंवा मला काही शारीरिक त्रास होत असेल, तर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सहवासात आल्यावर मनाची स्थिती सकारात्मक होऊन मला उत्साह आणि आनंद जाणवतो. त्यांच्या सहवासात मला शारीरिक त्रास जाणवत नाहीत. ‘मला सेवा करण्यासाठी त्याच ऊर्जा पुरवतात’, असे मला जाणवते.
५. साधकाला प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देणे : एखादी सेवा पूर्ण झाल्यावर ‘साधकाने कसे प्रयत्न केले ?’, हे त्या जाणून घेतात आणि ‘सेवा छान झाली’, असे सांगून त्याचे कौतुक करतात. प्रत्यक्षात त्या साधकाचा हात धरून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईच त्याच्याकडून सेवा करून घेत असतात आणि त्याला पुढील प्रयत्न करायला प्रोत्साहन देतात.
६. साधकांना समजून घेऊन त्यांना योग्य दृष्टीकोन देणे : साधकांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमुळे त्यांच्याकडून सेवेत काही चुका झाल्या, तर त्या साधकांना समजून घेतात; पण ‘आपल्यामुळे गुरुकार्याची हानी होऊ नये’, यासाठी योग्य काय करू शकतो’, याविषयी त्या मार्गदर्शन करतात.
– कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘मी काही वर्षांपासून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या समवेत सेवा करत आहे. ‘वेळोवेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांची साधकांवर असलेली प्रीती’, यांविषयीची सूत्रे येथे दिली आहेत.

१. व्यवस्थितपणा
१ अ. स्वतःच्या सर्व वस्तू स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे : ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सर्व वस्तू स्वच्छ आणि टापटीपपणे ठेवलेल्या आवडतात. ‘वस्तूवर धूळ असेल, तर तिची स्पंदने पालटतात आणि वस्तूंवर कसले डाग पडले, तर गुरुधनाची हानी होते’, असा त्यांचा विचार असतो. त्या नेहमी सर्व साहित्य स्वच्छ ठेवायला सांगतात आणि स्वतःही ते स्वच्छ ठेवतात.
१ आ. प्रत्येक कृती ईश्वरापर्यंत पोचावी, यासाठी वैयक्तिक कृतीही परिपूर्ण रीतीने करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ वैयक्तिक कृतीही परिपूर्ण रीतीने करतात. एकदा त्या त्यांचे कपडे घडी करत होत्या. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘कपडे घडी करून ठेवण्याची ही कृतीही परिपूर्ण व्हायला हवी, तरच ती ईश्वरापर्यंत पोचेल ! ‘जे काही आहे, ते सर्व देवाचेच आहे, स्वतःचे वेगळे असे काही नाही’, असा आपला विचार असायला हवा.’’
२. सेवा परिपूर्ण करणे
२ अ. ‘शंखनाद महोत्सवा’च्या कालावधीत उत्साहाने सर्व सेवा स्वीकारणे : मे २०२५ मध्ये फर्मागुडी (गोवा) येथे झालेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या कालावधीत श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ अल्प घंटे झोपून अन्य वेळी सेवाच करत होत्या. जसे महोत्सवाचे दिवस जवळ येत होते, तशी त्यांची सेवा आणि व्यस्तता यांत वाढ होत होती. २ दिवस राहिले असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सूत्रे विचारण्यासाठी एकाच वेळी २ – ३ साधक आले. त्या वेळीही त्या त्यांना म्हणाल्या, ‘‘या. काही विचारायचे असेल, तर या. आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि आपल्याला पुष्कळ सेवा करायची आहे.’’
त्यांच्याकडे आधीच पुष्कळ सेवा आहेत. त्यात अधिकची सेवा आल्यावरही त्यांनी ती आनंदाने आणि उत्साहाने स्वीकारली. यातून ‘त्या किती सहजतेने आणि उत्साहाने सेवा स्वीकारतात’, हे शिकायला मिळाले.
२ आ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ करत असलेली प्रत्येक सेवा समष्टीला लाभदायी आणि चैतन्यदायी आहे’, असे लक्षात येते.
२ इ. एकाच वेळी अनेक सेवांचे नियोजन करून त्या पूर्ण करणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ‘आश्रमातील आणि सर्वत्रच्या साधकांना मार्गदर्शन करणे, साधकांना अडचणींत साहाय्य करणे, तसेच घरातील सर्व दायित्वे पार पाडणे, सासूबाई पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी (सनातनच्या ११७ व्या संत, वय ८७ वर्षे) यांची काळजी घेणे’, यांसारख्या आणि अनेक सेवांचे नियोजन करतात अन् त्या सेवा एकाच वेळी करतात.
२ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून काही चूक झाल्यास त्या ‘माझ्याकडून ही चूक झाली, क्षमा करा’, असे म्हणतात. त्यांना एखाद्या सेवेत साहाय्य केल्यावर त्यासाठी त्या कृतज्ञता व्यक्त करतात.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ साधकांना प्रसाद देतात, त्या वेळी जाणवलेली सूत्रे
३ अ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना एखाद्या साधकाची आठवण आली की, त्या साधकासाठी प्रसाद देतात. मी त्या साधकांना तो प्रसाद नेऊन देते. तेव्हा मला साधकाकडून कळते की, ‘त्यालाही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची पुष्कळ आठवण येत होती.’
३ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी दिलेला प्रसाद हा ‘साधकाच्या आवडीचा असतो’, असे लक्षात येते.
३ इ. काही साधकांना आध्यात्मिक त्रास होत असतो. त्याच दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना त्या साधकाची आठवण येते आणि त्या त्याला प्रसाद देतात. ‘त्यांचा निरोप आणि प्रसाद मिळाल्यावर त्रास न्यून होतो’, असे साधक सांगतात.
३ ई. एखाद्या साधकाने साधनेचे प्रयत्न चांगले केले किंवा सेवा चांगली केली की, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ त्याला प्रेमाने खाऊ देतात. त्यांच्या प्रीतीमुळे साधकाचा कृतज्ञताभाव जागृत होतो.
४. गुरुदेवांप्रती कृतज्ञताभाव
समाजात पुष्कळ रज-तम असून समाजातील वातावरण चांगले नाही. ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी आपल्याला आश्रमात ठेवून साधनेसाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती दिली आहे’, असे त्या नेहमी सांगतात. याविषयी त्यांच्या मनात नेहमी कृतज्ञताभाव असतो.
– कु. प्रणिता भोर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.९.२०२५)
एकमेवाद्वितीयत्व असा हिंदु धर्म !
गुरुबोध
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. पूनम प्रभुदेसाई (वय ७९ वर्षे) यांचा साधना प्रवास !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा असलेल्या आणि शारीरिक त्रासांतही नृत्यकलेतून आनंद मिळवणार्या मडगाव (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (कु.) चांदणी आसोलकर (वय ३१ वर्षे) !
साधकांनो, मनातील अनावश्यक विचार न्यून करण्यासाठी प्रयत्न करून साधना आणि सेवा यांची फलनिष्पत्ती वाढवा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !