
वाराणसी (उत्तरप्रदेश) – सध्या श्राद्ध पक्ष चालू आहे. अनेकांना काशी किंवा गया येथे जाऊन श्राद्ध करण्याची इच्छा असते; मात्र ते शक्य होत नाही. अशांसाठी काशी येथील पुरोहितांना ऑनलाईन श्राद्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ विदेशातील हिंदूही घेत आहेत. येथे कॅमेरा जोडलेला असतो आणि पुरोहित संबंधित व्यक्तींसाठी श्राद्ध करून त्यांचे थेट प्रक्षेपण करतात. काही पुरोहित त्यांच्या भ्रमणभाष संचावर व्हिडिओ बनवून ते संबंधितांना पाठवत आहेत. या ऑनलाईन विधीसाठी ॲपद्वारे आरक्षण केले जाते आणि क्यूआर कोडद्वारे पैसे पाठवले जातात.
💻🕉️ Online Pind Daan in Kashi!
▪️ Priests in Varanasi now perform rituals via livestream 🎥
▪️ Families abroad (UK, US, Australia, Singapore) watch on their phones 📱
▪️ Booking through apps, QR code payments 💳
▪️ Gotra, name, address taken online ➝ Sankalp & Shraddh Karma… pic.twitter.com/dvnAwprjVY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 20, 2025
या संदर्भात आचार्य मोहित उपाध्याय यांना विचारले असता ते म्हणाले की, पूजा करवून घेणारे विदेशात बसून थेट विधी पहात आहेत. ऑस्ट्रेलिया, यु.के किंवा अमेरिका येथे अनेक भारतीय वंशाचे लोक आहेत. ते तिथे स्थायिक झाले आहेत; परंतु त्यांना काशीमध्ये त्यांच्या पूर्वजांसाठी पिंडदान करायचे आहे. त्यांना येथे येण्यास अडचणी येतात. अनेक लोक प्रकृती अस्वास्थ्यामुळे येऊ शकत नाहीत. म्हणून ते आमच्याशी संपर्क साधतात. आम्ही ज्यांच्यासाठी पिंडदान करायचा आहे, त्यांचे गोत्र, वंश आणि नाव आणि पत्ता विचारतो. भ्रमणभाषवरच संकल्प केला जातो, त्यानंतर पूजा चालू होते. आम्ही एकाच वेळी ५-६ लोकांसाठी पूजा करू शकतो.
पंडित योगी आलोक म्हणाले की, परदेशातून लोक नेहमीच काशीला येत आहेत; परंतु आता गर्दी वाढू लागल्याने परदेशातून येणार्या भाविकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे लोक पिंडदान ऑनलाईन करून घेऊ लागले आहेत.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !