
मुंबई – वर्ष २००८ मधील मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणातील ७ आरोपींची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने ३१ जुलै २०२५ या दिवशी निर्दाेष सुटका केली. न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार्या याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांनी मृतांच्या कुटुंबियांचा तपशील योग्य प्रकारे सादर न केल्यामुळे न्यायालयाने ही सुनावणी १ दिवसासाठी पुढे ढकलली. १८ सप्टेंबर या दिवशी ही सुनावणी होईल.
याचिकाकर्ते निसार अहमद यांच्या मुलाचा या बाँम्बस्फोटात मृत्यू झाला होता. आरोपींची निर्दाेष मुक्तता झाल्यावर निसार अहमद आणि अन्य ५ जणांनी या निर्णयाला आव्हान दिले आहे. १७ सप्टेंबर या दिवशी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपिठापुढे ही सुनावणी झाली. निसार अहमद यांना या खटल्यात साक्षीदार करण्यात आले नव्हते. असे असले तरी विशेष न्यायालयाच्या निर्देशानुसार निसार अहमद यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडली होती.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !