
छत्रपती संभाजीनगर – येथील मनसेचे ज्येष्ठ नेते तथा प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मनसे पक्षाचे त्यागपत्र दिले. ते पक्षाच्या स्थापनेपासून मनसेत कार्यरत होते. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंच्या मनोमीलनावर अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांनी अकस्मात् त्यागपत्र दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांचे त्यागपत्र हे मराठवाड्यातील मनसेसाठी एक धक्का असल्याचेही मानले जात आहे.
प्रकाश महाजन यांनी पक्षातील अंतर्गत वातावरणावर ताशेरे ओढत आणि मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांची क्षमा मागत आपल्या राजकीय प्रवासाचा नवा अध्याय चालू करण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, माझी अपेक्षा अत्यंत अल्प आहे. मला कुठल्याही पक्षात राहिलो तरी ना तिकीट, ना पदाची आवश्यकता होती. केवळ हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा, ही माझी भावना होती; परंतु अल्प अपेक्षा ठेवूनही माझ्या वाट्याला पुष्कळ उपेक्षा आली. लोकसभेच्या वेळी मला विचारण्यात आले नाही, विधानसभेच्या वेळी केवळ प्रचारासाठी माझा वापर केला गेला. माझ्यावर जे दायित्व दिले, ते मी पार पाडले. माझ्या कामाचे कौतुक नाही; पण माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाहीत, त्यांचे बोल मला लावण्यात आले. मनात कुठेतरी ‘आता थांबले पाहिजे’, अशी भावना होती. गंगेला बोल लावला, तेव्हाच थांबण्याची आवश्यकता होती. पहलगामच्या आक्रमणाच्या वेळीही थांबायला हवे होते; पण मला वाटले कुठेतरी सुधारणा होईल, असे म्हणत त्यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !