
हासन (कर्नाटक) – येथील मोसलेहोसाहल्ली गावात १३ सप्टेंबर या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जनासाठी काढलेल्या मिरवणुकीत एक भरधाव ट्रक घुसला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनुमाने २२ जण घायाळ झाले. हासनच्या उपायुक्त के.एस्. लता कुमारी यांनी सांगितले की, घायाळ झालेल्यांना उपचारांसाठी के.आय.एम्.एस्. रुग्णालयात भरती करण्यात आले आहे, तर ७ जणांवर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांनी सांगितले की, अपघातामागचे कारण शोधले जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते, भरधाव वेगाने जाणारा ट्रक दुभाजकाला धडकला आणि नंतर मिरवणुकीत घुसला.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेविषयी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. घायाळ झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. माजी मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी, तसेच हासनचे खासदार श्रेयस पटेल यांनीही या घटनेविषयी दुःख व्यक्त केले आहे.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन