नगरपालिका प्रशासनाविषयी नागरिकांत संतप्त भावना !

भंडारा – गणेशोत्सवाच्या काळात कृत्रिम टाक्या सिद्ध करून विसर्जनाची व्यवस्था नगरपालिकेने केली होती; मात्र गणेशमूर्ती विसर्जनानंतर बहिरंगेश्वर परिसरात खंडित झालेल्या गणेशमूर्ती विखुरलेल्या अवस्थेत परिसरात पडून आहेत, तसेच सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. नगरपालिका प्रशासनाने विखुरलेल्या गणेशमूर्ती पाणी असलेल्या नदीत पुन्हा विसर्जित करणे आवश्यक असतांना तसे केले नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाविषयी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. (नगरपालिका प्रशासनाने कृत्रिम तलाव निर्माण केल्यानंतर त्यात शिल्लक रहाणारे गणेशमूर्तींचे अवशेष पाणी असलेल्या नदीपात्रात पुन्हा विसर्जित करणे आवश्यक होते; मात्र नगरपालिका प्रशासनाने याचे नियोजनच केलेले नाही. त्यामुळे गणेशमूर्ती विखुरलेल्या अवस्थेत आढळणे हे एकप्रकारे श्री गणेश देवतेचे विडंबन झाले आहे. याला उत्तरदायी असणार्या नगरपालिका प्रशासकीय अधिकार्यांवर कारवाई केली पाहिजे ! – संपादक)
१. भंडारा येथील बहिरंगेश्वर मंदिर ही ग्रामदेवता आहे. सध्या या परिसरात गणेशमूर्ती विसर्जनानंतर विदारक दृश्य पहायला मिळत आहे. नगरपालिकेने शहरातील ५ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाची व्यवस्था केली होती.
२. यामध्ये मिस्कीन टँक बाग, खांब तलाव, पिंगलाई तलाव, सागर तलाव आणि वैनगंगा नदीचा समावेश होता.
३. यापैकी पर्यावरणाची हानी होऊ नये आणि विसर्जन योग्यरित्या करता यावे म्हणून मिस्कीन टँक गार्डन, खांब तलाव आणि पिंगलाई तलाव येथे कृत्रिम तलाव बांधण्यात आले.
४. या ठिकाणी भाविकांनी गणेशमूर्तींचे मोठ्या उत्साहाने विसर्जन केले. यासाठी नगरपालिका प्रशासनासमवेत नागरिकही उत्तरदायी असल्याच्या प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांतून उमटत आहेत.
संपादकीय भूमिकानागरिकांनी केवळ संताप व्यक्त करण्यापेक्षा गणेशमूर्ती विखुरलेल्या ठेवल्याप्रकरणी वेळीच खडसावले का नाही ? |
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !