छत्रपती संभाजी महाराज आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा जिवंत देखावा सादर !

घालवाड (जिल्हा कोल्हापूर) – शिरोळ तालुक्यातील घालवाड येथील नवजीवन तरुण मंडळाने गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीला फाटा देत आळंदी येथील वारकर्यांचा भव्य दिंडी सोहळा विसर्जन मिरवणूकीत पार पडला. या दिंडी सोहळ्यात गावातील पुरुष आणि स्त्री ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वजण कीर्तनाच्या संगतीत मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाच्या तालावर ठेका धरला. या मिरवणुकीत छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित, तसेच भारताने राबवलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयांवर जिवंत देखावा सादर केला.
नवजीवन तरुण मंडळ हे वर्ष १९८० मध्ये स्थापन झाले आहे. या मंडळाकडून प्रतिवर्षी पारंपरिक जिवंत देखावा सादर करण्यात येतो. शासनाचा आदेश आणि संरपंचाच्या देखरेखीखाली गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या आहेत. या वेळी चांगला उपक्रम राबवल्याविषयी पोलीस पाटील सावित्री तोडकर यांनी नवजीवन तरुण मंडळाचे आभार मानले. या वेळी मंडळाचे उपाध्यक्ष सर्वश्री रामदास जमदाडे, सचिव दीपक पाडे यांसह मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच