अमेरिकेच्या करवृद्धीच्या विरोधात अहिल्यानगर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन

अहिल्यानगर – आज तरुण पिढी पिझ्झा, बर्गर, शीतपेये इत्यादी आरोग्यास हानिकारक असलेल्या पदार्थांच्या आहारी गेली आहे. त्यांचे प्रबोधन करून सर्वांना स्वदेशी वस्तूंकडे वळवणे आवश्यक आहे. विशेषतः या सर्व पदार्थांचा व्यापार करणार्या अमेरिकेच्या आस्थापनांचा बहिष्कार करून पर्यायी भारतीय आस्थापनांची सेवा घेणे आवश्यक आहे, असे विधान ह.भ.प. नल्ला महाराज यांनी केले. अहिल्यानगर येथील डौले रुग्णालयाजवळ सावेडी या ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते.
अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्के अन्यायकारक कर लावल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर येथील विविध संघटनांनी पिझ्झा हट आणि के.एफ्.सी. यांच्यासमोर निदर्शने करत आंदोलन केले. या वेळी ‘गुरुगोरक्षनाथ प्रतिष्ठान’चे अध्यक्ष श्री. गोकुळ (नाना) आठरे, ‘वीर गोगादेव मंदिरा’चे विश्वस्त श्री. अनिल वाणे, श्री. संजय जोशी, श्री. प्रदीप वारुळे आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ४० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. या आंदोलनाचे सूत्रसंचालन श्री. अजिंक्य गायकवाड यांनी केले. या वेळी अहिल्यानगरचे हिंदुसंघटक श्री. बापू ठाणगे यांनी ‘अमेरिकन वस्तूंचा त्याग करून स्वदेशी वस्तूंचा अभिमानाने वापर करा’, असे आवाहन केले.
या आंदोलनात मॅकडोनाल्ड्स, के.एफ्.सी., पिझ्झा हट, डोमिनोज् आदी अमेरिकेच्या आस्थापनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. रामेश्वर भुकन यांनी सांगितले की, अमेरिकेच्या वस्तूंवर बहिष्कार टाकून स्वदेशीचा वापर करणे, ही काळाची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यलढ्यातील स्वदेशीचे शस्त्र पुन्हा वापरण्याची वेळ आली आहे. रशियाकडून तेल खरेदीचे कारण देऊन अमेरिकेने भारताच्या उद्योग, शेतकरी आणि अर्थव्यवस्थेवर आघात केला असून चीन अन् स्वतःसाठी मात्र वेगळे निकष लावले आहेत. हा निर्णय भारताला आर्थिक कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे.
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पक्षातील एकही खासदार फुटणार नसल्याचा शरद पवार यांना विश्वास !