गणेशोत्सवाच्या निमित्ताने…..
‘हे क्षेत्रच भगवान शिवशंकरांनी वसवले आणि त्यांनीच इथे श्री गणरायाची स्थापना केली. महागणपति (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे मंदिर अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपति म्हणून रांजणगावचा ‘महागणपति’ ओळखला जातो.

१. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणण्याचे कारण
पुरातन काळी गत्समद ऋषींचा पुत्र त्रिपुरासुर हा स्वतः श्री गणेशानेच दिलेल्या वरदानाने अत्यंत उन्मत झाला. त्याने सार्या देवादिकांना पराभूत केले. ऋषिमुनींना छळले. लोकजीवनात थैमान घालून त्यांना हैराण केले. या असुराच्या अत्याचारांनी सारे देवादिक हवालदिल झाले. देवतांनी प्रत्यक्ष शिवशंकरांना साकडे घातले आणि त्रिपुरासुराच्या विरुद्ध गार्हाणे मांडले. देवीदेवतांच्या विनंतीवरून भगवान शिवशंकरानी त्या उन्मत्त दैत्याचे पारिपत्य करण्याचे मान्य केले. त्यासाठी भगवान शंकरांनी इथे स्वतः या विनायकाची स्थापना करून श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. श्री गणेशाच्याच प्रेरणेने भगवान शंकरांनी त्या उन्मत्त दैत्याचा वध केला. त्यामुळेच कार्तिक शुद्ध पौर्णिमेला लोक ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ म्हणू लागले.
२. महागणपति मंदिराविषयीची माहिती
भाद्रपद शुद्ध गणेश चतुर्थीला रांजणगावात घरोघर गणेशमूर्तींची स्थापना होत नाही, तर सारे गावच या गणेशाची पूजा करून गणेश चतुर्थी साजरी करतात. थोरले माधवराव पेशवे यांची या गणेशावर असीम श्रद्धा होती. कधीही माधवराव स्वारीवर निघतांना श्रींचे आशीर्वाद घेऊनच जात. पेशवे यांनी इथल्या ‘अन्याबा देव’ यांना वंशपरंपरागत श्रींची पूजा करण्याची सनद लिहून दिली. ती आजतागायत अगदी २१ व्या शतकापर्यंत चालूच आहे. थोरले माधवराव पेशवे यांनी या मंदिराचा गाभारा बांधला, तर इंदूरचे सरदार किबे रावसाहेब यांनी सभागृह बांधून दिले. सभोवतालच्या ओवर्या पेशव्यांचे सरदार शिंदे आणि पवार यांनी बांधल्या. या मंदिराच्या जीर्णाेद्धारानंतर हे पुरातन मंदिर आता अत्यंत सुंदर भव्य आणि कलात्मक झाले आहे. आज या मंदिराशेजारीच गावकर्यांनी एक सुंदर बगीचाही उभारला आहे. त्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणि आकर्षणात अधिकच भर पडली आहे.’
– सौ. नंदा प्रेमानंद मडकईकर
(साभार : मासिक ‘भक्तिसंगम’, नोव्हेंबर २०१६)
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?