मंदिरांच्या हक्कांसाठी ठरला नवा मार्गदर्शक आराखडा !

रांजणगाव (जिल्हा पुणे), २३ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्र मंदिर महासंघाची राज्यस्तरीय कोअर कमिटी बैठक महागणपति मंदिर येथे नुकतीच उत्साहात पार पडली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट, अधिवक्ता अनुप जयस्वाल, ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीचा आरंभ सनातन शंखनाद महोत्सवाचा व्हिडिओ दाखवून आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाला. बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी महासंघाच्या माध्यमातून झालेल्या कृती आणि मिळालेल्या यशाचा आढावा घेतला. ‘अँटी लँड ग्रॅब ॲक्ट’विषयी जनजागृती करण्यात आली. श्री. सोमेश्वर संस्थान, अमरावती येथील शेतभूमी हडप प्रकरणाची माहिती अधिवक्ता अनुप जयस्वाल यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिराची भूमी अधिग्रहण करता येत नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर श्री. किशोर गंगणे यांनी मार्गदर्शन केले.

ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज यांनी पुण्यातील मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, वारीदरम्यान ख्रिस्ती मिशनर्यांकडून झालेले पत्रक वाटप आणि त्या विरोधात नोंदवलेल्या गुन्ह्याचा यशस्वी निकाल यांचा अनुभव उपस्थितांसमोर मांडला. त्यांच्या या कार्याचे श्री. महेश पाठक आणि श्री. सुनील घनवट यांनी कौतुक केले.
तुळजापूर येथे पुढील राज्यस्तरीय कोअर कमिटी बैठक !
दुपारच्या सत्रात माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख यांनी शासन मंदिर कह्यात घेण्यामागील कारणे स्पष्ट करतांना, गजानन महाराज मंदिर (शेगाव) येथील पारदर्शक व्यवहारामुळे शासनाला हस्तक्षेप करता येत नाही, याचे उदाहरण दिले. या वेळी मंदिर परिषद कुठे आयोजित करता येईल ? या संदर्भात चर्चा झाली. त्यात नाशिक आणि शेगाव ही ठिकाणे प्रामुख्याने सुचवली गेली. पुढील राज्यस्तरीय कोअर कमिटी बैठक तुळजापूर येथे १२ ऑक्टोबरला घेण्याचे ठरले.
मंदिर महासंघास अधिकृत संघटनेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन !
श्री. घनवट यांनी पुढील काळात मंदिर महासंघाला शासनाने अधिकृत संघटनेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे आवाहन केले. तसेच ‘अँटी लँड ग्रॅबींग ॲक्ट’ लागू करणे आणि ‘मद्य-मांस विक्रीबंदी कायदा’ या राज्यव्यापी ज्वलंत मागण्या पुढे रेटाव्यात, असे मत मांडले. कोअर कमिटीचे सदस्य प्रत्येक आठवड्याला ऑनलाईन बैठकीतून एकत्र जोडले जावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
बैठकीची सांगता घोषणा देऊन करण्यात आली. शेवटी महागणपति मंदिराच्या विश्वस्तांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला आणि भावी मंदिर परिषदेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली.
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ