सुरक्षेसाठी २२ ऑगस्टला मध्यरात्री ते २३ ऑगस्टला सायंकाळपर्यंत चौथर्यावरील दर्शन बंद !

अहिल्यानगर – २३ ऑगस्टला श्रावणात शनि अमावास्येचा योग जुळून आल्याने शनिशिंगणापूरला यात्रौत्सव आहे. त्यासाठी विश्वस्त, देवस्थान प्रशासन आणि सरकारी यंत्रणा यांच्या वतीने नियोजन चालू आहे. शनि अमावास्येनिमित्त ४ लाखांहून अधिक भाविक शनिदेवाच्या दर्शनाला येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यादृष्टीने देवस्थान प्रशासनाकडून नियोजन करण्यात आले आहे, असे देवस्थान प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के. दरंदले यांनी सांगितले. चौथर्यावरचा तैलाभिषेक या काळात बंद असला, तरी भाविक चौथर्यासमोरूनही शनिदेवास तेल वहात असतात.
२२ ऑगस्टला मध्यरात्री महाआरती होण्यापूर्वी ते २३ ऑगस्टला सायंकाळची आरती संपेपर्यंत चौथर्यावरील शनिदेव दर्शन बंद असणार आहे, तर शुक्रवारी सकाळपासून ते रविवारी सकाळपर्यंत मात्र भाविकांना शनिदेवाचे दर्शन खुले असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रतिदिन रात्री ११ ते पहाटे ४ पर्यंत मंदिर दर्शन बंद ठेवण्यात येते.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित