संघाशी मतभेद असून त्याचा इतिहास जाणून घेत असल्याचे मत

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकारमधील उपमुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी २१ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ गाऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले. भाजपच्या आमदारांनी शिवकुमार यांच्यावर मे मासात बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीवरून आरोप केला होता. त्यावर उत्तर देतांना शिवकुमार बोलत होते.
Karnataka Assembly saw a surprise when Congress Dy CM DK Shivakumar sang the RSS anthem.
He said he differs ideologically but is studying RSS history, while subtly hinting concern over its “influence on children.”pic.twitter.com/MrFfbIlQfu
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 22, 2025
VIDEO | Karnataka Deputy CM DK Shivakumar (@DKShivakumar) recited the RSS’ Sangha Prarthana, ‘Namaste Sada Vatsale Matribhume’, while addressing the Assembly yesterday.
(Source: Third party)
(Full VIDEO available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/2CNsemZaq4
— Press Trust of India (@PTI_News) August 22, 2025
रा.स्व. संघ मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करतो !
उपमुख्यमंत्री शिवकुमार पुढे म्हणाले की, मी जन्मजात काँग्रेसचा आहे आणि ते माझ्या रक्तातच आहे; पण मी सर्व राजकीय पक्षांचा अभ्यास केला आहे. मला ठाऊक आहे की, कर्नाटकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्था कशा उभारतो आहे ? एक नेता म्हणून मी अभ्यास केला आहे. तो प्रत्येक जिल्हा आणि तालुका येथील शाळा नियंत्रणात घेत आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवत आहे. संघवाले मुलांना शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
I am a Congressman for life!
I am a born Congressman; my blood, my life, everything is here. I know my friends and I know my opponents, and I understand them with clarity of thought. The RSS and BJP must reflect on their own history and ties, but let there be no doubt – I stand… pic.twitter.com/CTmOtK4FVF
— DK Shivakumar (@DKShivakumar) August 22, 2025
एक नेता म्हणून मला हे ठाऊक असले पाहिजे की, माझे प्रतिस्पर्धी कोण आहेत आणि माझे मित्र कोण आहेत ? म्हणून मी केवळ संघाबद्दल, संघाच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राजकीयदृष्ट्या आमच्यात पुष्कळ मतभेद आहेत, ते वेगळे प्रकरण आहे. ‘मी काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसचे नेतृत्व करीन’, असे त्यांनी पुढे सांगितले.
उत्तराखंडामध्ये सरकारी भूमीवरील अवैध मजार बुलडोझरद्वारे पाडली
रत्नागिरीत आयोगाचे कामकाज तातडीने पर्यायी जागेतून चालू करावे ! – संजय वैशंपायन
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
अवैध दारूधंदेवाल्यांची माहिती न दिल्यास संबंधित प्रशासकीय कारभार्यांचे मानधन रोखणार !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !