२२ ऑगस्टला पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये पुरस्कारांचे वितरण !
(ॲम्फी थिएटर म्हणजे एक खुले नाट्यगृह किंवा प्रेक्षागृह, जेथे गोलाकार किंवा अंडाकृती जागेच्या सभोवताली दर्शक बसण्यासाठी जागा केलेली असते)

पुणे – ‘विश्व संवाद केंद्र’ आणि ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ यांच्या वतीने माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात येणारे ‘आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२५’ घोषित झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार पुरस्काराने सावित्रीबाई फुले विद्यापिठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता (डीन) आणि वृत्तपत्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय तांबट, छायाचित्रकार प्रशांत खरोटे, बातमीदार सतीश वैजापूरकर, ‘डिजिटल इन्फ्लुएन्झर’ मुक्ता चैतन्य आणि आर्जे शोनाली यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे परिषद आणि नियामक मंडळाचे कार्यवाह आनंद काटीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक मिलिंद कांबळे उपस्थित होते. २२ ऑगस्टला फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध लेखक, वक्ते, ज्येष्ठ पत्रकार आणि देहली येथील ‘ऑर्गनायझर’ साप्ताहिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !