
सावंतवाडी – देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रज अधिकारी सर विल्यम फावरे याला ठार मारल्याचा आरोप स्वत:वर घेऊन देवू नाईक (हळणकर) यांनी फाशीची शिक्षा स्वीकारली होती. हुतात्मा देवू नाईक यांना तालुक्यातील डेगवे गावात फाशी देण्यात आली होती. फाशी दिलेल्या या जागेची १४ ऑगस्ट या दिवशी भाजप बांदा मंडलाच्या वतीने अभियान राबवून स्वच्छता करण्यात आली आणि हुतात्मा नाईक यांना श्रद्धांजली वहाण्यात आली.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा संघचालक श्री. अरविंद प्रभाकर कुडतरकर, संघाचे जिल्हा कुटुंब प्रबोधक श्री. भास्कर साधले, संघाचे स्वयंसेवक श्री. मधुकर उमाजी देसाई आणि श्री. स्वप्नील पाडगांवकर, डेगवे सरपंच श्री. राजन देसाई, उपसरपंच श्री. मंगेश देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !
मासेमारांना खोल समुद्रातील संपर्कासाठी ‘सॅटेलाईट फोन’ उपलब्ध होण्यासाठी सरकारचे प्रयत्न !
मोशी (पुणे) कचरा दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
विठ्ठलनामाचा गजर करत १५ दृष्टीहीन वारकर्यांची ४५० किलोमीटरची पायी वारी !