
मुंबई – अमेरिकेने केलेल्या करवाढीमध्ये मत्स उत्पादनावरील कर १६ टक्क्यावरून ६० टक्के इतका वाढवला आहे. त्यामुळे राज्यातील मत्सव्यवसायापुढे मत्स उत्पादन विक्रीची मोठी अडचण निर्माण झाली आहे; मात्र ही अडचण नसून सुवर्णसंधी आहे. अमेरिकेच्या करवाढीचा उपयोग देशांतर्गत मत्स्वव्यवसाय बळकटीकरणसाठी करूया, असे आवाहन मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी ११ ऑगस्ट या दिवशी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी नीतेश राणे म्हणाले, ‘‘आपला मत्स्यव्यवसाय हा केवळ निर्यातीवर अवलंबून नाही. अमेरिकेच्या व्यतिरिक्त युरोप आणि व्हिएतनाम येथे मत्स्य उत्पादनाची निर्यात करण्याची संधी आहे; परंतु केवळ निर्यातीवर अवलंबून न रहाता देशातंर्गत व्यवसायावर आपण भर द्यायला हवा. आपल्या देशात चीनच्या तोडीची मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. या निमित्ताने याकडे लक्ष केंद्रीत करूया. या अडचणीचा उपयोग भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी करूया.’’
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !