
पंढरपूर – रक्षाबंधनाच्या निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीदेवीस विशेष पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले होते. त्यामध्ये श्री विठ्ठलास सोने मुकुट, नाम, कौस्तुभ मणी, मोत्याचा तुरा, दंडपेट्ट्या जोड, हिर्याचा कंगन जोड, मोत्याची कंठी, मोत्याचा हार, बाजीराव कंठी, मत्स्य जोड, तुळशीची माळ, सहापदरी जानवे, लहान-मोठा शिरपेच, राखी, तसेच श्री रुक्मिणीदेवीला सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी, कंबरपट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र सुभेदार यांनी दिली.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !