उत्तरप्रदेशातील योगी सरकारचा अभिनंदनीय निर्णय

लक्ष्मणपुरी – ८ ते १० ऑगस्ट २०२५ या कालावधीत उत्तरप्रदेशातील महिलांना रक्षाबंधनानिमित्त राज्य परिवहन महामंडळ आणि शहरी बस सेवा यांमध्ये निःशुल्क प्रवासाची सुविधा मिळणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा केली आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना त्यांच्या भावांकडे सहजतेने जाता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना ३ दिवस निःशुल्क प्रवास करता येणार असल्यामुळे राज्यातील अनेक कुटुंबांमध्ये सणाच्या उत्साहात भर पडणार आहे.
१. ही सुविधा संपूर्ण उत्तरप्रदेशात लागू राहील. ८ ऑगस्ट या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून ते १० ऑगस्टच्या रात्री १२ वाजेपर्यंत महिलांना या निःशुल्क प्रवासाचा लाभ घेता येईल. या काळात कोणतीही तिकीट न काढता महिला बससेवा वापरू शकतात.
२. मुख्यमंत्र्यांनी अधिकार्यांना निर्देश दिले आहेत की, या काळात पुरेशा बससेवा उपलब्ध करून द्याव्यात. लक्ष्मणपुरी, कानपूर, गोरखपूर अशा मोठ्या शहरांमध्ये विशेष नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक