लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे गुरुपौर्णिमेनंतर झालेल्या आढावा बैठकीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० जुलै या दिवशी उत्तरप्रदेश राज्यात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. यानंतर पुढील काळात धर्मकार्याची दिशा ठरवण्यासाठी येथील ‘आनंद वेडिंग्ज अँड रिसॉर्ट’ येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. याप्रसंगी धर्मप्रेमींनी ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्रत्येक महिन्याला एकत्र येण्याचा निर्धार’ व्यक्त केला.
या वेळी नियमित धर्मशिक्षण आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग प्रत्येकी २ ठिकाणी चालू करण्याची इच्छा उपस्थित धर्मप्रेमींनी व्यक्त केली, तसेच अनुमाने ३५ जणांनी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार होण्याची इच्छा व्यक्त केली. धर्मप्रेमी डॉ. शुभम् शुक्ला आणि श्री. सूर्या यांनी हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार अन् वितरण करण्याचे दायित्व घेतले. येत्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने लक्ष्मणपुरी परिसरात ‘लव्ह जिहाद जागरूकता’ अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला अंसल क्षेत्राचे प्रदेशाध्यक्ष श्री. एम्.एल्. साहू, ‘ब्रह्मसागर’च्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुषमा मिश्रा, ‘ब्राह्मण परिवारा’चे सचिव श्री. रामकेवल मिश्रा, ‘आनंदा रिसॉर्ट्स’चे मालक श्री. इंद्रमोहन आनंदा आदी मान्यवरांसह अनेक धर्मप्रेमी उपस्थित होते.
गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च ; मात्र विद्यार्थी मूलभूत सुविधांपासून वंचित !
गुरुपौर्णिमेला १४ दिवस शिल्लक
रुग्णसेवा मनापासून करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे रत्नागिरी येथील नामवंत वैद्य (कै.) मंदार श्रीकांत भिडे (वय ५१ वर्षे) !