वैयक्तिक शत्रूत्वातून हत्या झाल्याचा प्राथमिक अनुमान

सोनीपत (हरियाणा) – येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका सैनिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. २७ जुलैच्या रात्री उशिरा ही घटना घडली. गोळ्यांचा आवाज ऐकून कुटुंबातील सदस्य तेथे आले. सैनिकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
लहान मुलाचा जन्म होऊन ३ दिवसच झाले होते !
कृष्णा असे सैनिकाचे नाव असून ते खेडी दमकन गावचा रहिवासी होते. कृष्णा सध्या छत्तीसगडमध्ये तैनात होते आणि १ महिन्याची सुटी घेऊन घरी आले होते. कृष्णा यांना २ मुले असून लहान मुलाचा जन्म अवघ्या ३ दिवसांपूर्वी झाला होता. त्यांची पत्नी अजूनही रुग्णालयात आहे. आरंभीच्या तपासानुसार कृष्णा हरिद्वारला कावड यात्रेसाठी गेले असता त्यांचे तेथे काही तरुणांशी भांडण झाले होते. त्यातून त्यांची हत्या केल्याचे अनुमान आहे.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !