
मुंबई – ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २६ जुलै या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे दर्शन घेतले. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी मुंबईमध्ये बोरीवली येथे राहून चातुर्मास व्रत करणार आहेत. या ठिकाणी यज्ञ, स्वामीजींचे प्रवचन असणार आहे.
राजनीतीपेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान अधिक मोठे आहे. वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गायीला महत्त्व आहे. सनातन संस्कृतीमध्ये गायीला देवता मानले जाते. मी मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रात गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला, हे मी माझे सौभाग्य समजतो. याला हिंदु धर्माचा सेवक म्हणून माझे दायित्व मानतो. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे महाराज यांनी गोरक्षणाचा प्रण घेतला होता. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने पुढे जात आहोत, असे या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !