न्यायालयाने माकपवाल्यांना ‘देशभक्त व्हा’ असाही दिला सल्ला !
मुबंई – गाझातील कथित नरसंहाराच्या विरोधात आंदोलन करण्याची अनुमती मागणार्या माकपला मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. देशामध्ये विविध समस्या असतांना शेकडो किलोमीटरवरील प्रश्नासाठी आंदोलन कशासाठी करता ? तुमची भूमिका देशाच्या परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध आहे. देशभक्त व्हा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने माकपला (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला) सुनावत माकपची याचिका फेटाळली.
🇮🇳 “Be Patriotic First!” – Bombay High Court Slams CPI(M)
📜 HC rejects CPI(M)’s plea to protest the Gaza massacre.
⚖️ Court says:
🔹 Their stance contradicts India’s foreign policy🔹 Why protest global issues while ignoring local ones?
VC: @TimesNow @anchoramitaw pic.twitter.com/nlQvI1i10f
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 26, 2025
मुंबई पोलिसांनी माकपच्या आंदोलनाला अनुमती नाकारल्यावर अनुमती मिळावी, यासाठी माकपकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली होती. याविषयी न्यायालय म्हणाले, ‘‘तुम्ही देशातील नोंदणीकृत संघटना आहात. तुम्ही कचरा टाकणे, प्रदूषण, सांडपाणी, पूर याचा निषेध का करत नाही ? देशाबाहेर सहस्रो मैलांवर घडणार्या गोष्टींचा निषेध करायचा आहे. देशाचे परराष्ट्र धोरण तुम्ही घेतलेल्या भूमिकेपेक्षा वेगळे आहे. तुमच्या या भूमिकेमुळे वाद उद्भवू शकतात. तुम्ही असे का करू इच्छिता ? देशाच्या परराष्ट्र व्यवहारांवर याचा काय परिणाम होऊ शकतो, याची तुम्हाला जाणव आहे का ? गाझा आणि पॅलेस्टाईन यांच्यातील समस्यांकडे पहाण्याऐवजी स्वत:च्या देशाकडे पहा.’’

FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड