महाराष्ट्र मंदिर महासंघाची निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांना मागणी

यवतमाळ, २५ जुलै (वार्ता.) – जिल्ह्यातील मंदिर, धार्मिक स्थळे यांचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांचे परिसर मद्य-मांस मुक्त करा, तसेच मंदिर परिसरात बेकायदेशीरपणे मांस आणि दारूची विक्री करणार्या व्यवसायिकांवर कायदेशीर कारवाई करा, अशा आशयाचे निवेदन २५ जुलैला महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना देण्यात आले. राळेगाव येथील शितलामाता मंदिर परिसरातील मांसविक्रीची दुकाने हटवण्यासाठी राळेगाव नगर पंचायत ठराव, तसेच २३ जुलैला राळेगाव नगर पंचायत मुख्याधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाची प्रत जोडण्यात आली.
निवेदन देतांना राळेगाव येथील श्रीराम मंदिराचे सचिव श्री. मेघश्याम चांदे, विठ्ठल मंदिराचे श्री. भूपेंद्र कारिया, हनुमान मंदिराचे श्री. सचिन चव्हाण, श्री. दिलीप दुदगीकर, तसेच यवतमाळ शहरातील संकटमोचन मंदिराचे अध्यक्ष श्री. रामदास नालमवार, रेणुकामाता मंदिराचे सचिव श्री. महादेवराव काचोरे, सिद्धिविनायक मंदिराचे उपाध्यक्ष डॉ. अजय कोलारकर, सचिव धनंजय जोशी, चिंतामणी देवालयाचे सचिव श्री. प्रदीप ढाले, वनवासी मारुति मंदिराचे डॉ. अशोक कुमार काळे, लोहारा येथील गजानन महाराज मंदिराचे श्री. गजानन सिरभाते, उपाध्यक्ष श्री. अनिल याऊल, सहसचिव श्री. तुळशीदास शिंदे, श्री. विजय दुर्शेट्टीवार, श्री. काशिनाथजी अघाव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक श्री. भगवानजी डगवार, सहजिल्हा संयोजक श्री. प्रकाश जानकर, राळेगाव तालुका संयोजक श्री. अनिल वर्मा, तसेच महासंघाचे जिल्हा संघटक श्री. दत्तात्रय फोकमारे उपस्थित होते.
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !