महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकारामुळे संस्थानला मिळाले न्यायालयीन संरक्षण

अमरावती – श्री काळेश्वर महादेव संस्थान, भूजवाडा (ता. दर्यापूर, जि. अमरावती) यांच्या मालकीच्या शेतभूमीवरील कब्जेदाराने कूळ खरेदीसाठी प्रविष्ट केलेले प्रकरण तहसीलदारांनी १० जुलै या दिवशी फेटाळून मंदिराच्या हक्काला कायदेशीर मान्यता दिली. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा पुढाकार आणि धर्मादाय आयुक्त प्राधिकरणाच्या निरीक्षकांचा सकारात्मक अहवाल यांमुळे मंदिराच्या भूमीचे रक्षण करणे शक्य झाले.
१. श्री काळेश्वर महादेव संस्थान उपाख्य श्री कोंडेश्वर महादेव संस्थान यांच्या मालकीची १५ एकर शेतभूमी संस्थानला १९१० आणि १९१२ मध्ये लाभलेली आहे. मंदिर व्यवस्थापनासाठी आवश्यक उत्पन्नाचा स्रोत म्हणून ती महत्त्वाची आहे.
२. सध्या मंदिराची अवस्था जीर्ण असून एकाने भूमीवर अतिक्रमण केले. संस्थानचे सर्व विश्वस्त मृत झाल्यानंतर त्याचा अपलाभ घेत कब्जेदाराने ६ एकर भूमीची खरेदी प्रक्रिया चालू केली.
३. हे लक्षात आल्यावर महासंघाचे राज्य पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल यांनी शेतभूमी विक्रीस कडाडून विरोध केला. त्यांनी ‘कूळ कायद्या’नुसार संस्थानला विक्रीपासून सूट असल्याचे अधोरेखित करत तसे प्रमाणपत्र सादर केले. तहसील कार्यालयात जमीन विक्री प्रक्रिया तात्काळ रहित करण्याची मागणी केली.
४. धर्मादाय आयुक्त प्राधिकरणामार्फत नियुक्त निरीक्षक जावेद पठाण यांनी संस्थानच्या बाजूने अहवाल दिला. त्यानुसार तहसीलदार रवींकुमार कानडजे यांनी संस्थानच्या शेतभूमीला कूळ कायदा लागू पडत नसल्याने आणि अशा हस्तांतरणाला धर्मदाय आयुक्तांच्या अनुमतीची आवश्यकता असल्याचे निष्कर्ष नोंदवत कब्जेदाराचे प्रकरण फेटाळून संस्थानच्या हक्काला मान्यता दिली.
५. भुजवाडा येथील भक्तांनी नवीन विश्वस्त मंडळ स्थापनेसाठी धर्मदाय सहआयुक्त अमरावती यांच्याकडे अर्ज केला असून महासंघाने प्रस्तावित विश्वस्तांना आवश्यक सूट प्रमाणपत्र मिळवून दिले आहे.
या यशात महासंघाचे राज्य पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल यांच्यासह सर्वश्री गजानन शेंडोकार, अक्षय सरडे, धनराज चव्हाण, देविदास वडूरकर, रवींद्र कानकिरड यांचा सहभाग आहे.
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !