
पुणे – ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या (हिंद स्वराज्य संघच्या) वतीने देण्यात येणारा यंदाचा ४३ वा ‘लोकमान्य टिळक’ राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांना घोषित झाला आहे. ‘टिळक स्मारक ट्रस्ट’चे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक यांनी २३ जुलैला पत्रकार परिषदेत पुरस्काराची घोषणा केली. १ ऑगस्ट या दिवशी येथील टिळक स्मारक मंदिरात सकाळी १०.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे डॉ. टिळक यांनी सांगितले.
डॉ. टिळक पुढे म्हणाले की, लोकमान्यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीचा स्वीकार करत गडकरी यांनी रस्त्यांच्या माध्यमातून राष्ट्र उभारणीत मोठे कार्य चालू केले आहे. विविध प्रकारच्या वाहन निर्मितीत स्वदेशीचा पुरस्कार आणि प्रसार त्यांच्याकडून होत आहे. देशाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांची ४३ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित