राष्ट्रीय परशुराम परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती

नागपूर, १८ जुलै (वार्ता.) – राष्ट्रीय परशुराम परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर नियुक्त झाल्याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने श्रीरामनारायण मिश्र यांचा शाल अन् श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी महासंघाचे श्री. प्रदीप पांडेगुरुजी, श्री. महादेवराव दमाहे आणि समितीचे श्री. अभिजीत पोलके, श्री. आशिष नागपूरकर अन् श्री. अतुल अर्वेन्ला उपस्थित होते.
श्रीरामनारायण मिश्र हे अखिल विश्व सरयूपारिण ब्राह्मण महासभेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर भारतीय संघ नागपूरचे अध्यक्ष आहेत. ते महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विदर्भ संयोजकही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या आणि महासंघाच्या कार्याला नवी ऊर्जा अन् गती प्राप्त होईल’, अशी आशा समितीने व्यक्त केली.
सत्कारानंतर श्रीरामनारायण मिश्रजी यांचा भाव जागृत झाला. ‘हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्रोत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच १२३ नावांपैकी राज्यस्तरावर माझी नियुक्ती झाली’, असे त्यांनी सांगितले.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !