निरोगी जीवनशैलीविषयी जागृती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
नवी देहली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व मंत्रालये, विभाग आणि स्वायत्त संस्था यांना आवाहन केले आहे की, प्रतिदिन खाण्यात येणार्या खाद्यपदार्थांमध्ये तेल आणि साखर यांचे प्रमाण दर्शवणारे ‘तेल आणि साखर फलक’ कार्यालयांमध्ये लावावेत. यामुळे निरोगी जीवनशैलीला चालना मिळेल आणि लठ्ठपणा किंवा अन्य आजारांपासून संरक्षण करता येईल.
#StopObesity | शारीरिक गतिविधियों की कमी न केवल मोटापा बढ़ाती है, बल्कि यह गंभीर स्वास्थ्य समस्याओं का कारण भी बन सकती है।
इसलिए, स्वस्थ जीवनशैली अपनाएं और नियमित व्यायाम को अपनी दिनचर्या का हिस्सा बनाकर बेहतर स्वास्थ्य की ओर कदम बढ़ाएं।#HealthForAll #Obesity #FitIndia pic.twitter.com/QBkdkOcgFS
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 15, 2025
१. मंत्रालयाने लठ्ठपणाच्या संदर्भात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व अधिकृत स्टेशनरी (लेटरहेड, लिफाफे, नोटपॅड, फोल्डर्स) यांवर आरोग्यविषयक संदेश छापण्याचे आवाहन केले आहे.
२. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी सांगितले की, भारतामध्ये प्रौढ आणि लहान मुले यांच्यामध्ये लठ्ठपणा वेगाने वाढत आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार शहरी भागातील प्रत्येक पाचपैकी एक प्रौढ व्यक्ती लठ्ठपणाने ग्रस्त आहे.
३. वर्ष २०२५ मध्ये प्रकाशित ‘लॅन्सेट जीबीडी २०२१ ओबेसिटी फोरकास्ट स्टडी’नुसार वर्ष २०२१ मध्ये भारतात १८ कोटी प्रौढ लोक लठ्ठ होते, जे वर्ष २०५० पर्यंत ही संख्या ४४ कोटी ९० लाखांवर पोचेल. यामुळे भारत लठ्ठ लोकांच्या संख्येत जगातील दुसर्या क्रमांकाचा देश ठरेल.
४. लठ्ठपणामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि काही प्रकारचा कर्करोग यांचा धोका वाढतो. तसेच मानसिक आरोग्य, शरिराची हालचाल, जीवनशैली आणि उत्पादकता यांवरही परिणाम करतो.
Advisory issued by Union Health Ministry to display Oil and Sugar Boards in workplaces is an initiative to promote healthier dietary habits
These Boards serve as behavioural nudges regarding hidden fats and excess sugar in various food products
The Advisory does… pic.twitter.com/UleZY8eGVj
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) July 15, 2025
५. सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांतील सार्वजनिक परिसरात (उदा. कँटीन, लॉबी, मिटिंग रूम्स) तेल आणि साखर यांच्या वापरांवर लक्ष वेधणारे डिजिटल फलक लावावेत, असे श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
६. लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजार यांच्याशी लढण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार पुरेसा नाही, तर जनजागृती आणि सवयींत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, असे केंद्र सरकारने अधोरेखित केले आहे.

थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !