अभूतपूर्व प्रतिसादात सातारा येथील गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी १ सहस्र २०० जिज्ञासूंची उपस्थिती !

सातारा, १२ जुलै (वार्ता.) – पूर्वी समोरासमोर युद्ध होत होते. त्यामध्ये सैन्य मारले जात होते; मात्र आता युद्धाची स्थिती पालटली आहे. आता अफू, चरस, गांजा, खोट्या नोटा, आतंकवादी आक्रमणे अशा प्रकारे युद्ध चालू आहे. नुकत्याच झालेल्या पहलगाम आतंकवादी आक्रमणानंतर आपण पाहिले असेलच की, अनेक अफवांचे पेव फुटले होते. देशाच्या सीमेवरील सुरक्षा महत्त्वाची तर आहेच, त्याचसमवेत अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सैनिक बनणे आवश्यक आहे, असे आवाहन ब्रिगेडियर श्री. हेमंत महाजन (निवृत्त) यांनी केले.
येथील ‘स्वराज मंगल कार्यालया’त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवामध्ये ते बोलत होते. या महोत्सवासाठी जिज्ञासूंचा भरभरून प्रतिसाद लाभला आणि १ सहस्र २०० जणांची उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांची वंदनीय उपस्थिती होती. त्यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी’ या ‘ई-बुक’चे प्रकाशन करण्यात आले.
मान्यवरांचे सत्कार




सातारा येथील ७ मराठा लाईट इन्फंट्रीच्या निवृत्त सैनिकांनी ब्रिगेडियर महाजन (निवृत्त) यांचा सत्कार केला. या वेळी कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त) यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कॅप्टन विजयकुमार मोरे (निवृत्त) यांच्या पत्नी सौ. वसुंधरा मोरे यांनी सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान केला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. राजकुमार सावंत यांच्या हस्ते ब्रिगेडियर महाजन (निवृत्त) यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सौ. वीणा सावंत यांच्या हस्ते सद्गुरु स्वाती खाडये यांचा सन्मान करण्यात आला.
आता पूर्वीची परिस्थिती राहिली नसून भारत ‘जशास तसे’ उत्तर देत आहे !

ब्रिगेडियर महाजन (निवृत्त) पुढे म्हणाले, ‘‘ देशाला सहस्रो किलोमीटर सागरी आणि भूमी सीमा लाभल्या आहेत. शत्रू राष्ट्राच्या सैनिकांकडून नक्षलवाद, आतंकवाद, माओवाद, हिंसाचार, दंगली, अपघात, घातपात आदी प्रकार घडवले जात आहेत, तर सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीर, चीनव्याप्त अक्साईचीन आदी भाग भारतापासून विलग झाले आहेत. पूर्वी शत्रू राष्ट्रांनी काही केले, तरी आपली भूमिका शांत आणि संयमाची असायची; मात्र आता ही परिस्थिती पालटली आहे. आपण जशास तसे उत्तर देत आहोत. नुकत्याच झालेल्या पहलगाम आक्रमणात प्रथम आर्थिक नाकेबंदी, नंतर पाणीबंदी आणि त्यानंतर १४ दिवसांनी आतंकवाद संपवण्यासाठी भूमीवरचे युद्ध लढण्यात आले. यामुळे आता शत्रू राष्ट्रांनीही याचा चांगलाच धसका घेतला आहे.

सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी साधना कशी महत्त्वाची आहे ?’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन सौ. भक्ती डाफळे यांनी केले.
महोत्सवस्थळी लावलेल्या शस्त्र प्रदर्शनाने पूर्वजांनी केलेल्या ऐतिहासिक शौर्याचे स्मरण !

महोत्सवस्थळी युवकांना शिवछत्रपतींचा जाज्वल्य आणि शौर्याचा वारसा दाखवण्यासाठी कोल्हापूर येथील शस्त्रसंग्रहक श्री. प्रसाद बनकर यांचे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे भव्य प्रदर्शन लावण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहून आपल्या पूर्वजांनी केलेल्या ऐतिहासिक शौर्याचे स्मरण झाले, तसेच पुष्कळ अमूल्य माहिती मिळाली, असे मत अनेकांनी व्यक्त केले. ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी स्वतः प्रदर्शन पाहिले आणि श्री. बनकर यांचे विशेष कौतुक केले.
अनेकांनी याचे ध्वनीचित्रीकरण केले, तसेच ‘सेल्फी’ (स्वत:हून स्वत:चे छायाचित्र काढणे) काढले. जिज्ञासूंचा सक्रीय सहभाग पाहून शस्त्र प्रदर्शनाचे आयोजक श्री. प्रसाद बनकर यांना पुष्कळ आनंद झाला. ‘आजपर्यंत एवढा चांगला प्रतिसाद फारच क्वचित मिळाला’, असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला.
क्षणचित्रे
१. सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत्त सैनिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवली होती. याचसमवेत युवक आणि युवती यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

२. श्री. गणेश शिंदे यांनी आदर्श दुर्गामाता महोत्सव, हिंदूसंघटनासाठीचे प्रयत्न आणि राष्ट्रविरोधी घटनांची सामाजिक माध्यमांद्वारे केलेली विशेष जागृती, ग्रामसभा घेऊन राष्ट्रद्रोही कृतींचा केलेला निषेध या कार्यासाठी श्री. गणेश शिंदे यांचा ब्रिगेडियर श्री. हेमंत महाजन (निवृत्त) यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सत्कार झाल्यावर श्री. गणेश शिंदे यांनी केलेल्या कार्याविषयी ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी त्यांना शाबासकी दिली.
३. सोहळा संपल्यावर सैन्यदलातून निवृत्त झालेल्या अनेकांनी ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांच्याशी चर्चा केली.

मुलांमध्ये धर्माविषयी आणि आचार धर्माविषयी जागृती होण्यासाठी बालकक्ष लावण्यात आला होता. हा कक्ष पाहून अनेकांनी बालकांवर कशा प्रकारे संस्कार घडवू शकतो ? याचे प्रात्यक्षिक पहायला मिळाल्याचे आवर्जून सांगितले.
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !
ठाणे येथे १ कोटी २८ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य जप्त !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
‘साधूग्राम’च्या भूसंपादनासाठी २ सहस्र २६७ कोटी रुपयांचा निधी मान्य
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
वडापावसाठी वर्तमानपत्राचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई !