Panun Kashmir Convention in Jammu : ‘पनून कश्मीर’साठी जम्मूत उद्या होणार राष्ट्रीय काश्मिरी हिंदू अधिवेशन !

‘यूथ फॉर पनून कश्मीर’ने ‘हिन्दू राष्ट्र की हुंकार, पनून कश्मीर हो साकार’ या ब्रीदवाक्यासह केले आयोजन !

(पनून कश्मीर म्हणजे आपले, हिंदूंचे काश्मीर)

‘यूथ फॉर पनून कश्मीर’च्या शिखर समितीचे अध्यक्ष श्री. राहुल कौल

जम्मू (जम्मू-काश्मीर) – १३ जुलै या दिवशी येथे ‘राष्ट्रीय काश्मिरी हिंदू अधिवेशन’ होणार आहे. ‘यूथ फॉर पनून कश्मीर’ या संघटनेने हे अधिवेशन आयोजित केले असून हिंदु जनजागृती समितीचाही यात सहभाग असणार आहे. भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ नेते, संत, विचारवंत, कार्यकर्ते येथे एकत्र येणार आहेत. हे अधिवेशन केवळ भाषणांसाठी नाही, तर एकतेसाठी होत आहे. काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराच्या सत्याला तोंड देण्याची सिद्धता करण्यासाठी आणि आपली मातृभूमीत ‘पनून कश्मीर’ची पुनर्स्थापना करण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून राष्ट्र संघटित होणार आहे, अशी माहिती ‘यूथ फॉर पनून कश्मीर’च्या शिखर समितीचे अध्यक्ष श्री. राहुल कौल यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.

अधिवेशनाला अनेक प्रथितयश हिंदु विचारवंत यांच्यासमवेतच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळेही संबोधित करणार आहेत. या अधिवेशनाचे ब्रीदवाक्य आहे – ‘‘हिन्दू राष्ट्र की हुंकार, पनून कश्मीर हो साकार !’’

“One Hindu, One Nation”: Rahul Kaul on Kashmiri Hindu Trauma & Hindu Unity | Sanatan Prabhat Podcast

जिहादच्या पहिल्या बळींना विसरणारे राष्ट्र नैतिक स्पष्टतेचा दावा करू शकत नाही !

हे अधिवेशन एका सभ्यतेचे महत्त्वाचे चिन्ह आहे. ‘पनून कश्मीर’ची निर्मिती हा  भारताच्या अपूर्ण ‘हिंदु न्याय प्रकल्पा’चा पाया आहे. जिहादच्या पहिल्या बळींना विसरणारे राष्ट्र नैतिक स्पष्टतेचा दावा करू शकत नाही. ‘पनून कश्मीर ही राष्ट्रीय आवश्यकता आहे’, असे आयोजन समितीने म्हटले आहे.