उत्तराखंडाचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची ग्वाही

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड राज्यातील ६ सहस्र ५०० एकरहून अधिक भूमी अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे आणि ५०० पेक्षा अधिक बेकायदेशीर थडगी हटवण्यात आली आहेत. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर मार्गाने झाली आहे. हे अभियान थांबणार नाही, बुलडोझर चालतच राहील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एका वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत दिली. त्यांच्या सरकारने ४ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या कार्यकाळात झालेल्या कार्याविषयी त्यांनी या मुलाखतीत माहिती दिली.
🚜 Crackdown Continues in Uttarakhand!
CM Pushkar Singh Dhami affirms:
✅ 6500+ acres freed from encroachment✅ 500+ illegal graves removed
✅ Action against officials aiding Muslim infiltrators 🚨
🕉️ “Every step I take is to strengthen Sanatan Dharma.” – Dhami ji 🇮🇳 pic.twitter.com/oPyXffIFcn
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 9, 2025
मुख्यमंत्री धामी यांनी मांडलेली सूत्रे
१. माझे सर्व कार्य सनातन धर्माला बळकटी देणारे !
माझे सर्व कार्य सनातन धर्माला बळकटी देणारे आहे. उत्तराखंडामधील ‘डेमोग्राफिक’ (लोकसंख्येच्या) रचनेत कोणताही अनैसर्गिक पालट होऊ दिला जाणार नाही.
२. घुसखोर मुसलमानांना कादगपत्रे देणार्या अधिकार्यांवर कारवाई
मुसलमानांच्या वाढत्या घुसखोरीच्या संदर्भात त्यांची ओळख पटवण्याचे काम चालू आहे. अशा लोकांचे आधारकार्ड, रेशन कार्ड आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात येत आहेत. ही कारवाई केवळ घुसखोरी थांबवण्यापुरती मर्यादित नाहीत. ज्यांनी ही कागदपत्रे त्यांना दिली त्या अधिकार्यांवरही कारवाई केली जात आहे.
३. आगामी अर्धकुंभासाठीची सिद्धता आधीच चालू झाली आहे. यावर्षी चारधाम यात्रेला ३८ लाखांहून अधिक भाविक आले आणि व्यवस्था सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत.
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hospital Gives Wrong Blood : राजस्थानमधील रुग्णालयात बाळंतीण महिलेला ‘ओ-पॉझिटिव्ह’ ऐवजी ‘चुकून ‘बी-पॉझिटिव्ह’ रक्त दिले : प्रकृती चिंताजनक !
‘Vikram-1’ Creates History : देशातील पहिल्या खासगी आस्थापनाकडून उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
RBI Polymer Notes : प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याविषयी रिझर्व्ह बँक विचाराधीन
Sonam Wangchuk : आमरण उपोषण करणारे सोनम वांगचुक यांना देहली पोलिसांनी रुग्णालयात केले भरती !