Gujrat Bangladeshis Deportation : २५० बांगलादेशींना हात बांधून परतवले – गुजरातचा ठणठणीत संदेश

कर्णावती (गुजरात) – गुजरातमध्ये रहाणार्‍या २५० बांगलादेशी घुसखोरांना २ जुलै या दिवशी हद्दपार करण्यात आले. या घुसखोरांना भारतीय वायूदलाच्या विशेष विमानाने वडोदरा वायूदलाच्या तळावरून ढाका (बांगलादेश) येथे पाठवण्यात आले. कडक सुरक्षेत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांनी ही कारवाई केली. कोणताही गोंधळ होऊ नये; म्हणून सर्व घुसखोरांचे हात बांधण्यात आले होते.

या बांगलादेशी घुसखोरांना कर्णावती, सुरत, वडोदरा आणि राजकोट यांसारख्या वेगवेगळ्या शहरांमधून पोलिसांच्या देखरेखीखाली बसमधून आणण्यात आले. गेल्या २ महिन्यांत १ सहस्र २०० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्यात आले आहे. बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांची तपासणी करून पोलीस त्यांची ओळख पटवत आहेत.

मोहीम आणखी तीव्र करणार !

अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, ही मोहीम आणखी तीव्र केली जाईल. विशेषतः मोठ्या शहरांमध्ये घुसखोरांवर लक्ष ठेवले जात आहे. संशयास्पद हालचालींबद्दल पोलिसांना माहिती देण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

अशी कारवाई देशभरातून प्रतिदिन होत राहिली पाहिजे आणि त्याच वेळी हे घुसखोर पुन्हा भारतात घुसखोरी करणार नाहीत, याकडे तितक्याच सतर्कतेने लक्ष ठेवले पाहिजे !