(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात प्रवेश करतांना परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

मैसूरु (कर्नाटक) – येथील ‘चामुंडी हिल’वरील श्री चामुंडेश्वरी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याच्या मागणीला खासदार यदुवीर वाडियार यांनी पाठिंबा दिला आहे. मैसूरुमध्ये बोलतांना यदुवीर वाडियार म्हणाले, ‘मी नेहमीच वस्त्रसंहितेच्या बाजूने आहे. धार्मिक स्थळांना भेट देतांना लोकांनी धार्मिक भावनेनेच यावे. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे.’ श्री चामुंडेश्वरी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी, अशी मागणी त्यांनी केली. तिरुपतीच्या धर्तीवर ‘चामुंडी हिल’मध्येही भ्रमणभाषवर बंदी घालावी. अलीकडे काही लोक नकळत देवीच्या मूळ मूर्तीचा व्हिडिओ बनवत आहेत. यामुळे धार्मिक स्थळाचे पावित्र्य भंग पावते. यासंदर्भात योग्य कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
🛕👭Implement a Dress Code at Shri Chamundeshwari Temple in Mysuru – @yaduveerwadiyar, Mysuru and Kodagu MP
(Dress code refers to a set of rules regarding clothing to be worn when entering the temple)
👉It is only because born-Hindus have abandoned #spiritual practices that… pic.twitter.com/YlHNYW1F7V
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2025
संपादकीय भूमिकाजन्महिंदूंनी धर्माचरण सोडल्यानेच अशी मागणी करावी लागते. मुसलमानांना त्यांच्या धार्मिक स्थळी अशा प्रकारे वस्त्रसंहिता लागू करण्याची मागणी करावी लागत नाही, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! |
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक