
मुंबई, २ जुलै (वार्ता.) – शेतकर्यांच्या विविध प्रश्नांविषयी विरोधकांनी प्रस्ताव सादर करावा, त्यावर ३ जुलै या दिवशी सभागृहात पूर्ण दिवस चर्चा करण्यात येईल, असे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २ जुलै या दिवशी स्पष्ट केले; मात्र तरीही ‘शेतकर्यांच्या आत्महत्या, त्यांच्या सोयीबीन खरेदीत झालेला अपव्यवहार, यांसह शेतकर्यांच्या इतर समस्यांवर आजच चर्चा करावी’, अशी आक्रमकपणे मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी केली.
यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, सरकार शेतकर्यांना साहाय्य करत आहे. विरोधी पक्षाचा प्रस्ताव ते देऊ शकतात. आम्ही चर्चा करायला सिद्ध आहोत. आम्ही चर्चेतून पळवाट काढत नाहीत. शेतकर्यांचे नाव घेऊन विरोधक राजकारण करत आहेत. आम्हीही शेतकरी आहोत. एखाद्याकडून वेगळ्या प्रकारचे वक्तव्य झाले असेल, तर त्याचे कुणीच समर्थन करत नाही.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन
सोलापूर येथील वैष्णवी मंदिर परिसरातील महाकाय वटवृक्ष आगीपासून वाचला !