कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचा निर्णय !

ठाणे, २७ जून (वार्ता.) – कल्याण-डोंबिवली परिसरात काही रिक्शाचालक अतिरिक्त भाडे आकारतात. त्यामुळे प्रवासी आणि रिक्शाचालक यांच्यात खटके उडतात. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांना त्यांची रितसर तक्रार करता यावी, यासाठी परिवहन विभागाकडून ९४२३४ ४८८२४ हा व्हॉट्सॲप क्रमांक घोषित करण्यात आला आहे, असे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे. (तक्रारी केल्यावर संबंधित रिक्शाचालकांवर कोणती कारवाई केली, हेही प्रवाशांना कळायला हवे ! – संपादक)
१. सी.एन्.जी.वर चालणार्या रिक्शांना १.५ कि.मी.साठी किमान २६ रुपये इतक्या भाडे दरवाढीला मान्यता देण्यात आली; मात्र काही रिक्शाचालकांकडून नव्याने निश्चित करण्यात आलेल्या दरांपेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आली आहे.
२. रिक्शाचालकांकडून अतिरिक्त भाडे आकारणे, नियमबाह्य अधिक प्रवासी वाहतूक करणे, भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन करणे, शिवीगाळ करणे इत्यादी प्रकारचे नियम भंग केल्यास प्रवाशांना थेट वरील भ्रमणभाष क्रमांकावर तक्रार प्रविष्ट करता येणार आहे.
३. तक्रार करतांना गुन्हा घडलेले ठिकाण, दिनांक, वेळ, गुन्ह्याचे स्वरूप, संबंधित रिक्शाचा क्रमांक, तसेच शक्य असल्यास छायाचित्रासह सर्व तपशील पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच