India China Relation : भारत-चीन संबंधांमध्ये गुंतागुंत टाळण्याचा उभय देशांचा प्रयत्न ! – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून

बीजिंग (चीन) – भारत आणि चीन यांच्यातील संबंधांमध्ये सकारात्मक गती कायम ठेवण्यावर आणि उभय देशांत गुंतागुंत टाळण्याच्या आवश्यकतेवर आम्ही भर दिला, असे वक्तव्य भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून केले. चीनमध्ये झालेल्या ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या बैठकीच्या वेळी राजनाथ सिंह आणि चीनचे संरक्षण मंत्री ॲडमिरल डोंग जून यांची भेट झाली. त्यावर सिंह यांनी हे वक्तव्य केले.

संरक्षण मंत्री सिंह पुढे म्हणाले की, आमच्यामध्ये रचनात्मक आणि भविष्यकाळातील विविध सूत्रांवर चर्चा झाली. ६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर कैलास मानसरोवर यात्रा पूर्ववत झाल्यावरून मी डोंग जून यांच्याकडे आनंद व्यक्त केला.

चीननेही निवेदन प्रस्तुत केले असून त्यात म्हटले की, चीन भारताशी संघर्ष करू इच्छित नाही. संवाद आणि परस्पर विश्वास वाढवणे, हे चीनचे उद्दिष्ट आहे.