|

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्यात वर्षानुवर्षे खराब रस्त्यांवरून तक्रारी करूनही प्रशासनाने काहीच न केल्याने कंटाळलेल्या लोकांनी स्वतःच रस्ते बांधण्यास आरंभले आहे. यासाठी जनताच देणग्या गोळा करून श्रमदानही करत आहे. त्यामुळे खराब झालेले रस्ते एका दिवसात दुरस्त झाले आहेत. राज्यातील ६ जिल्ह्यांतील ७ गावांमध्ये अशा प्रकारे रस्ते बांधण्यात आले आहेत. यांमध्ये गदग, धारवाड, शिवमोग्गा, कोडगू, कोप्पल आणि हासन या जिल्ह्यांचा समावेश आहे.
१. चिक्कमगळुरू जिल्ह्यातील लोकांनी १५ लाख ७५ सहस्र रुपये गोळा करून २८६ मीटर लांबीचा रस्ता बांधला.
२. हासन जिल्ह्यातील एका व्यक्तीने ४ ट्रक विटा दान केल्या. त्यानंतर गावकर्यांनी अन्य साहित्य गोळा करून श्रमदान करत रस्ता बांधला.
३. ‘पीपल्स रोड’ नावाच्या संस्थेचे संस्थापक स्वप्नील बंडी म्हणाले की, आम्हाला देशभरातील प्रत्येक राज्यात अशी मोहीम राबवायची आहे, जेणेकरून सरकारी यंत्रणेला त्यांचे दायित्व ठोसपणाने कळेल. (गेंड्याची कातडी घेतलेल्या कामचुकार प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर याचा कोणताच परिणाम होणार नाही, हेच खरे ! – संपादक) आतापर्यंत २८६ गावांनी आमच्याशी संपर्क साधला आहे.

|
जनतेने श्रमदान करून बांधलेले रस्ते !
१. कोप्पल जिल्ह्यातील एका गावात १.५ किमी लांबीचा रस्ता.
२. शिवमोग्गा जिल्ह्यातील एका गावात २ किमी लांबीचा रस्ता.
३. धारवाड जिल्ह्यातील एका गावात शाळकरी मुलांनी तुटलेला रस्ता दुरुस्त केल्यानंतर गावकर्यांनी तेथे पक्का रस्ता बांधला.
४. कोडगू जिल्ह्यातील एका भागात अनुमाने २ किमीपर्यंतचा रस्ता.
५. गदग जिल्ह्यातील एका गावात अनेक रस्ते बांधले जात आहेत. आतापर्यंत २ किमीपेक्षा अधिक रस्ते बांधले गेले आहेत.
संपादकीय भूमिका
|
Russian Missile Attack : भारताने रशियाच्या राजदूताला बोलावून निषेध नोंदवला !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार
हत्येच्या घटनेला विरोध करणार्याविरुद्ध नोंदवलेल्या गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती !
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
उच्च न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर मोरजी किनारपट्टीवरील २३ अनधिकृत बांधकामे पाडली
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती