रेल्वे रूळ ओलांडतांना तरुणाचा मृत्यू !

मुंबई – चेंबूर-टिळकनगर या रेल्वेमार्गावरील रूळ ओलांडताना १८ जून या दिवशी २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तरुणाच्या देहाचा काही भाग लोकलच्या चाकात अडकल्याने बराच वेळ लोकल उभी होती. लोकल मार्गस्थ झाली आणि मानखुर्द येथे पोचताच तरुणाचे कपडे लोकलमध्ये अडकल्याचे लक्षात आले. त्यामुळे मानखुर्द येथे पुन्हा लोकल थांबली. या घटनेमुळे संपूर्ण हार्बर मार्गिका खोळंबली. परिणामी, अनेक लोकल रहित कराव्या लागल्याने रेल्वेस्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली.
२१ जून या दिवशी ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सवा’चे आयोजन

मुंबई – जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाद्वारे ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ साजरा केला जाणार आहे. या निमित्त ‘महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली. २१ जून या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात दुपारी ४.३० वाजता हा सोहळा होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ रेडिओ पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे.
क्रेनच्या धडकेने वारकर्याचा मृत्यू !

पिंपरी – देहू-आळंदी रस्त्यावर तळवडे येथे १८ जूनला दुपारी वारकरी नारायण गोदवे (वय ५७ वर्षे) देहूहून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्तीजवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. चिखली पोलिसांनी त्यांना त्वरित वाय्.सी.एम्. रुग्णालयात भरती केले; मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पोलिसांनी क्रेनचालकाला कह्यात घेतले आहे.
पोलिसांना १ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित !

सराईत गुंड शाहरूखच्या मृत्यूचे प्रकरण
पुणे – शहरातील कुख्यात गुंड शाहरूख उपाख्य अट्टी रहिम शेख याचा सोलापूरमधील लांबोटी गावात मध्यरात्री झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. पुण्यातील टिपू पठाण टोळीचा सदस्य असलेल्या शाहरूखवर हत्या, दरोडा, गोळीबार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. यासाठी गुन्हे शाखेच्या विभाग ६ च्या पथकाचे कौतुक पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले असून त्या पथकाला १ लाख रुपयांचे पारितोषिक घोषित केले आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !