
खचलेल्या रस्त्यात बस अडकली !

मुंबई – गिरगावातील ‘मेट्रो ३’ स्थानकाचे काम चालू असलेल्या ठिकाणचा रस्ता अचानक खचला. त्यात ५ फूट खोल खड्डा पडून बेस्टची बस अडकली. प्रवाशांना मध्येच उतरावे लागले, तसेच बस अडकून पडल्याने वाहतूककोंडी झाली.
१३ वर्षांची विद्यार्थिनी गर्भवती !

नागपूर – येथे इयत्ता आठवीत असणारी १३ वर्षांची विद्यार्थिनी ६ आठवड्यांची गर्भवती आहे, हे उघड झाल्यावर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या शेजारी रहाणार्या १९ वर्षीय तरुणाविरोधात पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाआपली मुले काय करतात, याकडे पालकांनीही लक्ष द्यायला हवे ! |
दौंड-पुणे डेमूच्या डब्यात आग !

पुणे – दौंड स्थानकावरून पुण्याकडे नियमित वेळापत्रकानुसार निघालेली डेमू यवत स्थानकावर थांबलेली असतांना एकाने बिडी पेटवून स्वच्छतागृहाच्या जवळ असलेल्या कचरापेटीत टाकली. त्यामुळे आग लागून डब्यातून धूर येऊ लागला. आर्.पी.एफ्. आणि रेल्वेचे कर्मचारी यांनी आग विझल्यानंतर गाडी ८.१४ वाजता स्थानकावरून रवाना झाली. या घटनेनंतर मध्य प्रदेशातील ५५ वर्षीय भिक्षेकर्याला रेल्वे पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
कागदी आणि प्लास्टिक कपाच्या वापरावर बंदी !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – चहा आणि कॉफी यांसाठी वापरण्यात येणार्या कागदी अन् प्लास्टिक कपमध्ये आतील बाजूस पातळ प्लास्टिक आवरण असल्यामुळे १ जुलै पासून इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील चहाच्या टपर्या आणि उपहारगृहे यांमध्ये प्लास्टिक अथवा कागदी कप यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय नगर पथविक्रेता समितीच्या सभेत घेण्यात आला आहे.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !