कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण !

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील गोळ्यांचा आवाज ऐकून तिथे गेल्याची साक्ष देणारे सचिन ओसवाल हे उलट तपासणीत ‘क्रमांक १०८ ला दूरभाष केला’, असे सांगतात, तर सरकार पक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या साक्षीत ‘क्रमांक १०१ ला दूरभाष केला’, असे सांगतात. वयस्कर वडिलांना हृदयविकाराचा त्रास असनूही ‘काही क्षणात वडील गोळ्या झाडल्याच्या ठिकाणी पोचले’, असे सांगतात, तसेच गोळ्या झाडलेला रस्ता रहदारीचा असून कॉ. पानसरे दांपत्यावर गोळीबार झाल्यावर त्यांना ‘केवळ कॉ. पानसरे कुटुंबियांच्या नातेवाइकांनीच त्या दांपत्यास चारचाकी गाडीत घालून रुग्णालयात नेले’, असे सांगत आहेत. त्यामुळे ओसवाल यांच्या साक्षीत अनेक विसंगती असून त्या अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलट तपासणीत न्यायालयाच्या समोर उघड केल्या. कॉ. गोविंद पानसरे हत्येच्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस्.एस्. तांबे यांच्यासमोर चालू आहे. ११ जून या दिवशी झालेल्या सुनावणीत अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी वरील विसंगती उघड केली.
सरकार पक्षाच्या वतीने कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील एक साक्षीदार सचिन ओसवाल यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली असून बचावपक्षाच्या वतीने त्यांची उलट तपासणी चालू आहे. सरकार पक्षाच्या वतीने अधिवक्ता शिवाजीराव राणे उपस्थित होते. या प्रसंगी अधिवक्ता समीर पटवर्धन, अधिवक्ता प्रीती पाटील उपस्थित होत्या. पुढील सुनावणी २० जून या दिवशी होणार आहे.
कथित सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांचे पारपत्र परत करण्यासंदर्भात सर्वाेच्च न्यायालयाची संयत भूमिका !
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री