आरोग्य विभागातील महिलेच्या तक्रारीची नोंद न घेणार्‍या २ अधिकार्‍यांना नोटीस !

राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्यानंतर महापालिका आयुक्तांना आली जाग !

 

पुणे – महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिलेने जानेवारी २०२५ मध्ये भाजप कामगार आघाडीचे शहराध्यक्ष ओंकार कदम हे मानसिक त्रास देत असल्याची तक्रार आयुक्तांसह आरोग्य प्रमुख आणि महिला तक्रार निवारण समितीकडे केली होती. या तक्रारीची नोंद न घेतल्याने संबंधित व्यक्तीकडून महिलेला त्रास देणे चालूच होते. त्यामुळे तिने राज्य महिला आयोगाकडे तक्रार प्रविष्ट केली. महापालिका आयुक्तांनी या तक्रारीची नोंद घेऊन ओंकार कदम याला पालिकेत येण्यास बंदी घातली आहे, तसेच वर्ष २०२५ मध्ये केलेल्या तक्रारीची नोंद न देण्याच्या संदर्भात खुलासा करण्याची नोटीस आरोग्य प्रमुखांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिली आहे.

संपादकीय भूमिका 

इतक्या संवेदनशील विषयावरील तक्रारीची नोंद न घेणार्‍या अधिकार्‍यांना बडतर्फ केले पाहिजे !