Pakistan Raises Assembly Speakers Salaries : पाकमध्ये दोन्ही संसदेच्या अध्यक्षांच्या वेतनात ६ पट वाढ

भिकेकंगाल पाकमधील उधळपट्टी !

पाकिस्तान संसद

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये महागाईने टोक गाठलेले असतांना आणि पाकला जगात भीक मागावी लागत असतांना दोन्ही संसदेचे अध्यक्ष यांच्या वेतनात ६ पटींनी वाढ करण्यात आली आहे. आता या दोघांनाही प्रतिमहा १३ लाख पाकिस्तानी रुपये वेतन मिळणार आहे, जे याआधी केवळ २ लाख ५ सहस्र रुपये इतके होते. ही वाढ १ जानेवारी २०२५ पासून लागू होणार असल्याने त्यांना गेल्या ५ महिन्यांचे वेतन वरील वाढीनुसार मिळणार आहे.

मार्च महिन्यात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि सल्लागार यांचे वेतन १८८ टक्क्यांनी वाढवण्यात आले होते. तसेच खासदारांसाठी ५ लाख १९ सहस्र रुपये मासिक वेतन संमत करण्यात आले.